कोरोना बळींची दडवादडवी अधिकाऱ्याला नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 01:37 AM2021-06-18T01:37:02+5:302021-06-18T01:38:13+5:30
कोरोना मृत्यूसह अन्य बाबींच्या नोंदी अद्ययावत ठेवल्या नाही. विलंबित बळी खासगी रुग्णालयांचेच असल्याचे सांगून प्रत्यक्षात त्यात शासकीय आणि खासगी अशा दोन्ही रुग्णालयांतील बळींच्या नोंदी घुसवण्यात येत आहेत. हे निदर्शनास आल्याने जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी नोडल अधिकारी अनंत पवार यांना नोटीस बजावत अंतिम कार्यवाही दोन दिवसात पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.
नाशिक : कोरोना मृत्यूसह अन्य बाबींच्या नोंदी अद्ययावत ठेवल्या नाही. विलंबित बळी खासगी रुग्णालयांचेच असल्याचे सांगून प्रत्यक्षात त्यात शासकीय आणि खासगी अशा दोन्ही रुग्णालयांतील बळींच्या नोंदी घुसवण्यात येत आहेत. हे निदर्शनास आल्याने जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी नोडल अधिकारी अनंत पवार यांना नोटीस बजावत अंतिम कार्यवाही दोन दिवसात पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांनी या घोळाबाबत कठोर शब्दात जाब विचारला आहे. संबंधित अधिकाऱ्याकडे केवळ आकडेवारी संकलित करण्याची जबाबदारी होती, असे नमूद करण्यात आले आहे. तसेच आकडेवारीतील बदल, त्रुटी सुधारण्याचे निर्देश दिले होते. माहितीचे स्त्रोत तपासून घेणे अभिप्रेत असताना तसे केल्याचे दिसून येत n मृत्युसंख्येची माहिती खासगी रुग्णालयांनी अद्ययावत केली नसल्याचे सांगण्यात आले होते. ही संख्या ५०० पर्यंतच असल्याची चुकीची माहिती देण्यात आली होती. मात्र सध्या अद्ययावत होणारी बळींची संख्या शासकीय आणि खासगी रुग्णालय दोन्हीकडील असल्याचे निदर्शनास आल्याचे नोटीसमध्ये नमूद आहे.नसल्याचेही नोटीशीत नमूद आहे.