बळींच्या नोंदीतील घोळाबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून नोडल अधिकाऱ्याला नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:11 AM2021-06-18T04:11:23+5:302021-06-18T04:11:23+5:30

नाशिक : कोरोनाच्या मृत्यूसह अन्य बाबींच्या नोंदी अद्ययावत ठेवल्या गेल्या नाहीत. तसेच विलंबित बळी केवळ खासगी रुग्णालयांचेच असल्याचे सांगून ...

Notice from District Collector to Nodal Officer regarding confusion in victim registration | बळींच्या नोंदीतील घोळाबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून नोडल अधिकाऱ्याला नोटीस

बळींच्या नोंदीतील घोळाबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून नोडल अधिकाऱ्याला नोटीस

Next

नाशिक : कोरोनाच्या मृत्यूसह अन्य बाबींच्या नोंदी अद्ययावत ठेवल्या गेल्या नाहीत. तसेच विलंबित बळी केवळ खासगी रुग्णालयांचेच असल्याचे सांगून प्रत्यक्षात त्यात शासकीय आणि खासगी अशा दोन्ही रुग्णालयांतील बळींच्या नोंदी घुसवण्यात येत आहेत. हे निदर्शनास आल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी संबंधित नोडल अधिकारी अनंत पवार यांना कारणे दाखवा नोटीस बजावत खुलासा करण्यासाठी अंतिम कार्यवाही दोन दिवसात पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांनी या आकडेवारीतील घोळाबाबत कठोर शब्दात जाब विचारला आहे. त्यात संबंधित अधिकाऱ्याकडे कोरोना काळात पूर्णवेळ केवळ आकडेवारी संकलित करण्याची जबाबदारी निर्धारित करण्यात आली होती, असे नमूद करण्यात आले आहे. तसेच ज्या विभागाची किंवा रुग्णालयांची आकडेवारी तांत्रिकदृष्ट्या सुसंगत वाटत नसेल, त्या विभागाच्या घटना व्यवस्थापकाशी बोलणी करून ती बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आणण्याचे निर्देशदेखील देण्यात आले होते. तसेच काहीवेळा आकडेवारीत वारंवार केले जाणारे बदल, त्रुटी याबाबत सूचित करूनदेखील सुधारणेबाबतचे निर्देश दिल्याचे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले होते. माहिती संकलित करताना माहितीचे स्त्रोत व्यवस्थित तपासून घेणे अभिप्रेत असताना तसे आपण केल्याचे दिसून येत नसल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी या पत्रात नमूद केले आहे.

इन्फो

स्पष्टीकरणही चुकीचे

जिल्ह्यातील मृत्युसंख्येच्या अद्यावतीकरणासंदर्भात कार्यवाही सुरू झाल्यानंतर ही माहिती खासगी रुग्णालयांनी अद्ययावत केली नसल्याचे सांगण्यात आले होते. ही संख्या ५०० पर्यंतच असल्याची चुकीची माहिती देण्यात आली होती. मात्र सध्या अद्ययावत होणारी बळींची संख्या शासकीय आणि खासगी रुग्णालय दोन्हीकडील असल्याचे निदर्शनास आल्याचेही या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.

Web Title: Notice from District Collector to Nodal Officer regarding confusion in victim registration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.