निधी विनियोग अध्यक्षांच्या सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 12:35 AM2018-08-25T00:35:39+5:302018-08-25T00:37:25+5:30
ग्रामपंचायतींना जिल्हा परिषदेच्या नियोजन मंडळाकडून प्राप्त करून देण्यात आलेला जनसुविधा योजनेचा सुमारे ३४ कोटी रुपयांचा निधी योग्य वेळेत आणि योग्य कामासाठी खर्च करण्याच्या सूचना अध्यक्ष शीतल सांगळे यांनी ग्रामपंचायतींना दिलेल्या आहेत.
नाशिक : ग्रामपंचायतींना जिल्हा परिषदेच्या नियोजन मंडळाकडून प्राप्त करून देण्यात आलेला जनसुविधा योजनेचा सुमारे ३४ कोटी रुपयांचा निधी योग्य वेळेत आणि योग्य कामासाठी खर्च करण्याच्या सूचना अध्यक्ष शीतल सांगळे यांनी ग्रामपंचायतींना दिलेल्या आहेत.
ग्रामीण भागाच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक बिगरआदिवासी योजनेंतर्गत जिल्हा परिषद स्तरावरून सन २०१७-१८ करिता जनसुविधा विशेष अनुदान ३४ कोटी ८ लाख १२ हजार रु पयांचे अनुदान ग्रामपंचायतींना वितरित करण्यात आले आहे. ग्रामपंचायतींना जनसुविधा योजनेअंतर्गत जिल्हा नियोजन मंडळाकडून निधी उपलब्ध करून दिला जातो. प्रस्तुत वितरित करण्यात आलेल्या अनुदानातून ग्रामविकासाची तथा जनतेच्या मूलभूत गरजांची कामे मार्गी लागावी या हेतूने ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक यांनी कामे करणे अपेक्षित आहे अशी सूचना जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सांगळे यांनी दिल्या आहेत.
नाशिक जिल्हा परिषदेमार्फत तालुकानिहाय ग्रामपंचायतींना खालीलप्रमाणे अनुदान वितरित करण्यात आलेले आहे.