शेतकऱ्यांना दुसरे धनादेश देण्याची सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 12:51 AM2018-05-13T00:51:43+5:302018-05-13T00:51:43+5:30
तुम्ही शेतकºयांना दिलेल्या धनादेशाचे कुरियर हरवले असल्याने संबंधितांना नव्याने धनादेश द्यावा किंवा इतर मार्गाने पैसे अदा करावेत असे पत्र राजापूरच्या महाराष्ट्र बँकेने धनादेश देणाºया व्यापाºयांना दिले आहे. यामुळे धनादेश हरवले बँकेने पण दुसरा धनादेश मिळविण्यासह पैशांसाठी शेतकºयांना मनस्ताप करण्याची वेळ आली आहे. यामुळे संताप व्यक्त होत आहे.
राजापूर : तुम्ही शेतकºयांना दिलेल्या धनादेशाचे कुरियर हरवले असल्याने संबंधितांना नव्याने धनादेश द्यावा किंवा इतर मार्गाने पैसे अदा करावेत असे पत्र राजापूरच्या महाराष्ट्र बँकेने धनादेश देणाºया व्यापाºयांना दिले आहे. यामुळे धनादेश हरवले बँकेने पण दुसरा धनादेश मिळविण्यासह पैशांसाठी शेतकºयांना मनस्ताप करण्याची वेळ आली आहे. यामुळे संताप व्यक्त होत आहे. राजापूर येथे महाराष्ट्र बँकेची शाखा असून, राष्ट्रीयीकृत असलेली एकमेव बँक या परिसरात असल्याने पाच ते सहा गावांतील शेतकºयांचे आर्थिक व्यवहार येथून चालतात. शेतमाल विक्रीसह इतर खासगी व्यवहारांचे धनादेशदेखील शेतकरी व इतर ग्रामस्थ येथेच वटणावळीसाठी जमा करतात. नेहमीप्रमाणे येथे जमा झालेले शेतकºयांचे सुमारे १७ लाखांच्या रकमेचे ४२ धनादेश राजापूर शाखेचे व्यवस्थापक देशमुख यांनी येवला येथील सोमाणी कुरियरकडे ९ एप्रिल रोजी कुरियर करण्यासाठी दिले. हे टपाल येवल्यातून नाशिक येथील सोमाणी कुरियरकडे पाठवले होते. मात्र, सोमाणी कुरियरने हे टपाल टिळकरोड येथील सर्व सेवा शाखा बँकेत देण्याऐवजी गडकरी चौक येथील बँक आॅफ महाराष्ट्र मुख्य कार्यालयात जमा केल्याचे तपासात उघड झाले आहे. या बेचाळीस शेतकºयांना ज्यांनी चेक दिले त्यांना उद्देशून दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, आपण दिलेला धनादेश आपल्या बँक खात्यातून वटणावळ झाला की नाही ते पाहावे. नाहीतर संबंधितांना नव्याने धनादेश द्यावा किंवा रोख व इतर मार्गाने पैसे देण्यात यावे, अशी विनंती बँकेने या पत्राद्वारे केली आहे. वास्तविक या सगळ्या प्रकारात कुठलाही दोष नसताना धनादेश बँकेत जमा केलेले शेतकरी मात्र मनस्ताप सहन करत असून आता दुसरा धनादेश किंवा पैसे मिळविण्यासाठी त्यांना वारंवार चकरा माराव्या लागणार आहेत.