नोंदणी न करणाऱ्या रुग्णालयांना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 01:05 AM2018-04-03T01:05:51+5:302018-04-03T01:05:51+5:30

नवीन नियमावलीनुसार शहरातील रुग्णालयांनी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे नोंदणी व नूतनीकरण करण्याकरिता देण्यात आलेली ३१ मार्चची मुदत संपल्यानंतर ५७६ पैकी ३२५ रुग्णालयांनी नोंदणी अथवा नूतनीकरणासाठी काहीच प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने आता संबंधित रुग्णालयांना नोटिसा बजावण्याची कार्यवाही सुरू केली असून, १५ एप्रिलच्या आत अनधिकृत रुग्णालये बंद न झाल्यास महापालिकेमार्फत कारवाई केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Notice to the hospitals not registering | नोंदणी न करणाऱ्या रुग्णालयांना नोटिसा

नोंदणी न करणाऱ्या रुग्णालयांना नोटिसा

Next

नाशिक : नवीन नियमावलीनुसार शहरातील रुग्णालयांनी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे नोंदणी व नूतनीकरण करण्याकरिता देण्यात आलेली ३१ मार्चची मुदत संपल्यानंतर ५७६ पैकी ३२५ रुग्णालयांनी नोंदणी अथवा नूतनीकरणासाठी काहीच प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने आता संबंधित रुग्णालयांना नोटिसा बजावण्याची कार्यवाही सुरू केली असून, १५ एप्रिलच्या आत अनधिकृत रुग्णालये बंद न झाल्यास महापालिकेमार्फत कारवाई केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, महापालिकेच्या इशाºयानंतर २४१ रुग्णालयांची नोंदणी-नूतनीकरण केल्याची माहिती आहे.  शहरातील रुग्णालयांच्यासुरक्षिततेच्या दृष्टीने राज्य सरकारने नव्याने नियमावली आणली आहे. त्यात प्रामुख्याने नगररचनासह अग्निशमन विभाग, पर्यावरण तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाचे ना हरकत प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहेत. रुग्णालयात अग्निशमन यंत्रणा बसविणे, इमारतींचा मिश्र वापर असल्यास दोन जिन्यांची व्यवस्था करणे, खाटांनुसार वाहनतळाची सुविधा उपलब्ध करून देणे आदी नियमांचा त्यात समावेश आहे. मात्र, या नियमांमधून जुन्या रुग्णालयांना वगळण्यात यावे अथवा त्यांना सवलत देण्यात यावी, वाहनतळाचे नियम शिथिल करावेत तसेच बांधकामे नियमित करण्यासाठी हार्डशिप प्रीमिअम केवळ नवीन रुग्णालयांसाठी लागू करावा आदी मागण्या आयएमएने महापालिकेकडे मांडल्या होत्या. परंतु, आयुक्तांनी नियमानुसारच कार्यवाही होईल, अन्यथा १ एप्रिलपासून नोंदणी न करणाºया रुग्णालयांवर सील ठोकण्याची कारवाई केली जाणार असल्याचा इशारा दिला होता. ३१ मार्च २०१८ पर्यंत शहरातील ५७६ रुग्णालयांपैकी २४१ रुग्णालयांनीच नोंदणी व नूतनीकरणाला प्रतिसाद दिला असून, १० रुग्णालयांचे नूतनीकरणासाठी अर्ज प्राप्त झाले आहेत. ७० नवीन रुग्णालयांनी नोंदणीसाठी अर्ज केले आहेत.
१५ दिवसांची मुदत
महापालिकेने संबंधित रुग्णालयांना ३१ मार्च २०१८ ची मुदत दिलेली होती. परंतु, मुदत देऊनही सुमारे ३२५ रुग्णालयांनी नोंदणीच केलेली नाही. त्यामुळे आता सदर रुग्णालये बंद का करू नये, अशा नोटिसा पाठविण्यात येत आहे. १५ दिवसांत संबंधितांनी स्वत:हून अनधिकृत रुग्णालय बंद न केल्यास महापालिकेमार्फत बंद करण्याची आणि फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याची कारवाई केली जाणार आहे.

Web Title: Notice to the hospitals not registering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.