पिंपळगावी कॅफेचालकांना बजावल्या नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 10:06 PM2020-02-12T22:06:23+5:302020-02-12T22:07:29+5:30
पिंपळगाव बसवंत : कॅफेच्या नावाखाली महाविद्यालयीन युवक-युवतींकडून पैसे घेऊन त्यांना अश्लील चाळे करण्यासाठी सुविधा पुरविणाऱ्या पिंपळगाव बसवंत शहरातील काही ...
पिंपळगाव बसवंत : कॅफेच्या नावाखाली महाविद्यालयीन युवक-युवतींकडून पैसे घेऊन त्यांना अश्लील चाळे करण्यासाठी सुविधा पुरविणाऱ्या पिंपळगाव बसवंत शहरातील काही कॅफेचालकांना पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत.
पालकांनो, सावधान! आपले पाल्य महाविद्यालयात गेल्यावर कॅफेत तर जात नाही ना, याची खातरजमा करून घ्या, असे आवाहनही पोलिसांनी पालकांना केले आहे. शिक्षणासाठी येणाºया युवक-युवतींना एकांत मिळावा यासाठी पिंपळगाव बसवंत परिसरात सुरू झालेले कॅफे अश्लील कृत्यांमुळे बदनाम होऊ पाहत आहेत. कॅफेतील गैरकृत्याला आळा घालण्यासाठी व्हॅलेंटाइन डेच्या पार्श्वभूमीवर पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यामार्फत कॅफेचालकांना नोटिसा देण्यात आल्याने कॅफे व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे. मिनी दुबई व व्यापारी शहर म्हणून ओळखल्या जाणाºया पिंपळगाव बसवंत परिसरात अनेक व्यावसायिकांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध दुकाने थाटली आहेत. परिसरातील गावांतील विद्यार्थी येथील महाविद्यालयात मोठ्या संख्येने येतात. मात्र, शहरात थाटलेल्या काही कॅफेमध्ये प्रेमीयुगुलांना कोणतेही कागदपत्रे न पाहता खोल्या उपलब्ध करून दिल्या जात असल्याची तक्रार पोलिसांकडे एका नागरिकाने केली होती. त्याची दखल घेत पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत. या भागात गेल्या काही वर्षांपासून कॅफेचे फॅड निर्माण झाले. महाविद्यालयाच्या परिसरात पाच ते सहा कॅफे आहेत. मात्र, त्यातील बहुतांशी कॅफे बदनामीच्या फेºयात आहेत.
कॅफेत गेलेल्या व्यक्तीस समोर कोण आहे, हेही तिथे असणाºया अंधाºया तसेच मंद प्रकाशात ओळखू येत नाही. त्यात दुसºयाला प्रवेशही मिळत नाही. त्यामुळे तेथे नेमके चाललंय काय हे समजतही नाही. कॅफेत युवक व युवती किती वेळ घालवतात यावर तेथील बिल ठरते. त्यामुळे अनैतिक गोष्टींना येथे चालना मिळत असल्याचे बोलले जात आहे. यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार दाखल झाल्यानंतर कॅफेचालकांना नोटिसा बजावण्यात आल्या. असे प्रकार उघडकीस आल्यास कारवाई करण्याची तंबीही पोलिसांनी दिली आहे. द्राक्षपंढरी व मिनी दुबई म्हणून देशात लौकिक मिळालेल्या पिंपळगाव बसवंतचे नाव कॅफेतील गैरकृत्यांमुळे मलिन होत असल्याने पिंपळगाववासीय व महाविद्यालयात शिक्षण घेणाºया पाल्यांच्या पालकांनी आपले मूल कॉलेजातच जाते की नाही याची खात्री करण्याचेही आवाहन पोलिसांनी केले आहे. पिंपळगाव बसवंत परिसरात सध्याचे वातावरण पालकांना घोर लावणारे आहे. कॅफेबरोबरच काहीजण भाडेतत्त्वावर घेतलेल्या खोल्यांचा अवैध वापर युवक-युवतींना एकांतपणा मिळावा यासाठी करीत असल्याचे बोलले जाते. त्यासाठी संबंधितांकडून जादा पैसे आकारून काहींनी पैसे कमाविण्याचा नवा फंडा शोधल्याचे बोलले जाते. त्यामुळे अपार्टमेंटमध्ये अशा प्रकारे गैरप्रकार सुरू असल्याने स्थानिकांनाही त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, उघडपणे कोणीही त्याबाबत आवाज उठवत नाही.
युवक-युवतींच्या मित्रत्वाचे संबंध असावेत. मात्र, कॅफेच्या नावाखाली सुरू असलेल्या ठिकाणी अंधाºया ठिकाणी केवळ दोघेजण बसणे, तेथे अश्लील चाळे करणे हे योग्य नाही. यातून युवक-युवतींच्या भविष्यावर परिणाम होऊ शकतो. व्यवसायाचा हा नवा फंडा संस्कृती बिघडण्यास कारणीभूत ठरत असल्याचे तक्रारदाराने नाव न सांगण्याच्या अटीवर ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. पिंपळगाव बसवंत परिसरातील सुरू असलेल्या कॅफेमध्ये ’व्हॅलेंटाइन डे’ची बुकिंग करण्यात आलेली आहे. तसेच या काही कॅफेमधून परिसरात रूम मिळत असल्याचे बोलले जात असल्याने प्रेमीयुगुलांनी १४ फेब्रुवारीसाठी तो कॅफे आपल्याला मिळावा, यासाठी सेटिंगही करीत आहेत.
परिसरातील कॅफेंवर गैरवर्तन केले जात असल्याची माहिती मिळाल्याने कॅफेचालकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. काहीही अनधिकृत प्रकार कॅफेवर निदर्शनास आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.
- कुणाल सपकाळे,
सहायक पोलीस निरीक्षक
कॅफेच्या नावाखाली प्रेमीयुगुलांना मोकळीक व एकांत मिळावा यासाठी पिंपळगाव बसवंत परिसरातील कॅफेमध्ये जादा पैसे घेऊन अवैधरीत्या खोल्या दिल्या जातात. अशा कॅफेवर कारवाई व्हावी व पालकांनीदेखील आपल्या पाल्याकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
- तक्र ारदार