वीस हजार मिळकतधारकांना बजावली नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:18 AM2021-09-08T04:18:58+5:302021-09-08T04:18:58+5:30
महापालिकेच्या पूर्व विभागात प्रभाग १४, १५, १६, २३ व ३० असे एकूण पाच प्रभाग आहेत. या प्रभागांमध्ये जुने नाशिक, ...
महापालिकेच्या पूर्व विभागात प्रभाग १४, १५, १६, २३ व ३० असे एकूण पाच प्रभाग आहेत. या प्रभागांमध्ये जुने नाशिक, द्वारका, भाभानगर, शिवाजीवाडी, दीपालीनगर, भारतनगर, इंदिरानगर, परबनगर, कमोदनगर, राजीवनगर, सुचितानगर, साईनाथनगर, डीजीपीनगर क्रमांक एक, गांधीनगर, वडाळा गावासह परिसर येतो. पूर्व विभागात घरपट्टीचे ८३ हजार ७४३ मिळकतधारक आहेत. त्यापैकी ज्या मिळकतधारकांकडे घरपट्टीची थकबाकी आहे अशा वीस हजार ८८३ घरपट्टी थकबाकीदार मिळकतधारकांना महापालिकेने नोटीस बजावली आहे. गेल्या वर्षी कोरोना महामारीमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, तसेच व्यवसाय ठप्प झाले. त्यामुळे नागरिकांना आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागले. त्याची दखल घेत महापालिकेच्या वतीने अभय योजनेंतर्गत थकबाकीदार घरपट्टीधारकांना सूट जाहीर करण्यात आली आहे. मात्र, तरीही थकबाकी न भरल्यास अशा मिळकतधारकांची मालमत्ता जप्त करण्यात येणार आहे.