अतिक्र मणधारकांना नोटीस नगर पंचायतीची कारवाई : चौकातील रस्ते घेणार मोकळा श्वास; नागरिकांकडून स्वागत कळवणला अतिक्रमणे जमीनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 11:57 PM2018-05-08T23:57:38+5:302018-05-08T23:57:38+5:30

कळवण : रस्ते विकासकामांमध्ये अडथळा ठरत असलेली अतिक्रमणे मंगळवारी नगर पंचायतीतर्फे जमीनदोस्त करण्यात आली. या कारवाईचे अतिक्रमणधारकांनी नाराजी व्यक्त केली असली तरी दुसरीकडे मात्र कळवणकरांनी स्वागत केले.

Notice to municipal corporation, Panchayat action: breathing empty roads; Encroachment racket welcomed by citizens | अतिक्र मणधारकांना नोटीस नगर पंचायतीची कारवाई : चौकातील रस्ते घेणार मोकळा श्वास; नागरिकांकडून स्वागत कळवणला अतिक्रमणे जमीनदोस्त

अतिक्र मणधारकांना नोटीस नगर पंचायतीची कारवाई : चौकातील रस्ते घेणार मोकळा श्वास; नागरिकांकडून स्वागत कळवणला अतिक्रमणे जमीनदोस्त

Next
ठळक मुद्देरस्ते अरुंद झाल्याने वाहतुकीची कोंडी मंजुरी घेऊन निधीसाठी पाठपुरावा करण्यात आला

कळवण : रस्ते विकासकामांमध्ये अडथळा ठरत असलेली अतिक्रमणे मंगळवारी नगर पंचायतीतर्फे जमीनदोस्त करण्यात आली. या कारवाईचे अतिक्रमणधारकांनी नाराजी व्यक्त केली असली तरी दुसरीकडे मात्र कळवणकरांनी स्वागत केले. नगर पंचायतअंतर्गत विविध नगर व चौक, दुर्लक्षित रस्त्याचे रुंदीकरण करून रस्ते दळणवळणयुक्त करण्याचा सपाटा नगराध्यक्ष सुनीता पगार, उपनगराध्यक्ष भाग्यश्री पगार, गटनेते कौतिक पगार, मुख्याधिकारी डॉ.सचिन पटेल यांनी लावला असल्याने शहरातील विविध भागात रस्त्यांचे रुंदीकरण, सिमेंट काँक्रिटीकरण, रस्ते डांबरीकरण करण्याची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. मात्र शहरांतर्गत रस्त्यावर छोट्या-मोठ्या प्रमाणात अतिक्रमणाचा विळखा पडल्यामुळे रस्ते अरुंद झाल्याने वाहतुकीची कोंडी होऊ लागल्याने शहरातील अंतर्गत रस्त्यांचे सर्वेक्षण करून रस्ता रुंदीकरण करण्यासाठी नगर पंचायतस्तरावरून पाऊले उचलली गेली. रस्त्यांच्या प्रस्तावांना जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्याकडून मंजुरी घेऊन निधीसाठी पाठपुरावा करण्यात आला. नगरोत्थान, दलितवस्ती, शहर विकास कार्यक्रमांतर्गत निधी उपलब्ध झाल्याने रस्ता रुंदीकरण व गटार बांधकाम आदी कामे नगर पंचायतने हाती घेऊन सुरू केल्याने सावरकर चौक, माउली चौक, मशीद परिसर, शाहीर लेन या परिसरातील रस्ते विकासकामांमध्ये अतिक्रमण अडथळा ठरू पहात होते. अतिक्रमण काढण्याबाबत जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी आक्रमक पाऊले उचलून रस्ते मोकळे करण्याच्या सूचना नगरपंचायत प्रशासनाला दिल्या असल्याने या रस्त्यावरील अतिक्र मण काढण्याबाबत नोटीस दिल्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात येऊन रस्ता मोकळा करण्यात आला. कळवण नगर पंचायतीमार्फत शहरांतर्गत रस्त्यांचे व गटारी दुरु स्तीचे काम सुरू असून, या कामात अडथळा ठरू पाहणाऱ्या अतिक्र मणासंदर्भात अतिक्र मणधारक, टपरीधारक यांना नगर पंचायतीने अतिक्र मण काढून घेण्याबाबत नोटीस दिली होती. मात्र अतिक्र मण काढण्यात आली नाही म्हणून मुख्याधिकारी डॉ. सचिन पटेल यांनी नगर पंचायतच्या यंत्रणेसह अतिक्र मणावर जेसीबी चालवून अतिक्र मणांवर काढले. ग्रामपंचायत होती म्हणून अतिक्र मण काढले जात नव्हते. नगर पंचायत अस्तित्वात आल्यानंतर रस्त्यावरील अतिक्र मणांवर जेसीबी फिरवला जात आहे. नगर पंचायतकडून रस्ते विकासकामे करताना अतिक्र मण काढण्याची प्रक्रि या राबवली जाते. शिवाजीनगर, सावरकर चौक, शाहीर लेन, मशीद परिसरातील अतिक्र मण काढण्यात आले. त्यामुळे कळवणकरांनी आनंद व्यक्त केला. एकंदरीत रस्त्यावरील अतिक्र मण काढल्याने रस्त्यासोबतच पादचारी व वाहनधारकांनीही सुटकेचा श्वास घेतला. यानंतर अतिक्र मण होणारच नाही, यासाठी नगर पंचायत प्रशासनाने वेळीच दखल घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे. कळवण नगर पंचायतअंतर्गत रस्त्यावरील अतिक्र मण काढण्याबाबत मुख्याधिकारी डॉ. सचिन पटेल यांनी आक्र मक भूमिका घेतल्यामुळे या भूमिकेचे शहरातून सर्वत्र स्वागत केले जात आहे. शिवाजीनगर भागात कलावतीमाता मंदिराकडे जाणाºया रस्त्यावर नगरपंचायतची परवानगी न घेता या भागातील रहिवाशांनी अडचणीची ठरणारी सिमेंट काँक्र ीटची संरक्षक भिंत बांधून एका उद्योगपतीने या भागातील नागरिकांना वेठीस धरले आहे. सावरकर चौक, शाहीरलेन, मशीद परिसरातील रस्त्यांवरील जुन्या गटारीवर नागरिकांनी अतिक्र मण करून बांधलेल्या पायºया, ओटे, लोखंडी जिने आदी अतिक्र मण काढण्यात आले. तत्पूर्वी स्वत:हून अतिक्र मण काढण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या होत्या. त्यानुसार काहींनी स्वत: पुढाकार घेऊन अतिक्र मण काढले, तर काहींनी अतिक्र मण काढले नव्हते. आता पुन्हा अतिक्र मण होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे असे मत कैलास माउली, विजय वालखडे, किरण केले, महेंद्र पगारे यांनी व्यक्त केले. रस्त्यावर अडथळा ठरलेली संरक्षक भिंत काढण्यासाठी मुख्याधिकारी डॉ. सचिन पटेल यांनी पाऊले उचलावीत, अशी मागणी या भागातील रहिवाशांनी केली आहे.

Web Title: Notice to municipal corporation, Panchayat action: breathing empty roads; Encroachment racket welcomed by citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक