पाणी साचल्यास पालिका नागरिकांना धाडणार नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 12:48 AM2018-07-12T00:48:09+5:302018-07-12T00:48:23+5:30

महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने शहरात विविध उपाययोजना केल्यानंतरही डासांचे प्रमाण वाढत असून, जून महिन्यानंतर जुलै महिन्यातही सोळाहून अधिक रुग्ण आढळल्याने आयुक्त तुकाराम मुुंढे यांनी संबंधित अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेतली व कामकाजाविषयी नाराजी व्यक्त केली. अस्वच्छता करणाºया गोठेधारकांना नोटिसा बजावण्याबरोबरच अस्वच्छता करणारे नागरिक तसेच तळघरात व अन्य ठिकाणी डासांची उत्पत्ती वाढण्यास पूरक अस्वच्छता ठेवणाºयांना नोटिसा देऊन कारवाईचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

 Notice to municipal corporation to send water if water gets set | पाणी साचल्यास पालिका नागरिकांना धाडणार नोटिसा

पाणी साचल्यास पालिका नागरिकांना धाडणार नोटिसा

Next

नाशिक : महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने शहरात विविध उपाययोजना केल्यानंतरही डासांचे प्रमाण वाढत असून, जून महिन्यानंतर जुलै महिन्यातही सोळाहून अधिक रुग्ण आढळल्याने आयुक्त तुकाराम मुुंढे यांनी संबंधित अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेतली व कामकाजाविषयी नाराजी व्यक्त केली. अस्वच्छता करणाºया गोठेधारकांना नोटिसा बजावण्याबरोबरच अस्वच्छता करणारे नागरिक तसेच तळघरात व अन्य ठिकाणी डासांची उत्पत्ती वाढण्यास पूरक अस्वच्छता ठेवणाºयांना नोटिसा देऊन कारवाईचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.  महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या अध्यक्षतेखाली डास निर्मूलन समितीची सभा आयुक्तांच्या दालनात संपन्न झाली. यावेळी झालेल्या बैठकीस आरोग्य, घनकचरा, बांधकाम, पाणीपुरवठा, शिक्षण मंडळ, विभागीय हिवताप अधिकारी (राज्य) व नगररचना विभागातील विभागप्रमुख तसेच सहाही विभागांचे विभागीय अधिकारी हजर होते.  डास व डासांपासून होणारे विविध आजार नियंत्रणात ठेवण्यासाठी महापालिकेच्या विविध विभागांमार्फत डास प्रतिबंधात्मक अळीनाशक फवारणी व धूर फवारणी, पाणीसाठे तपासणे, किरकोळ अभियांत्रिकी कामे, आरोग्य  शिक्षण, जीवशास्त्रीय उपाययोजना, ताप रुग्ण सर्वेक्षण, रक्तजल नमुने घेणे, नोटीस देण्यासह विविध प्रकारची कामे करण्यात येत असल्याचा संबंधित विभागप्रमुखांचा दावा असला तरी पण डेंग्यू रुग्ण संख्येत वाढ होत आहे.  जानेवारी ते जून या कालावधीत डेंग्यूचे ११७ रुग्ण आढळले आहेत. त्यातही मनपाच्या सातपूर, सिडको व नाशिकरोड विभागात डेंग्यूचे जास्त रु ग्ण आढळले असून, जून महिन्यात प्रभाग २६, प्रभाग ३१, प्रभाग २ मध्ये अधिक रु ग्ण आढळले आहेत. मनपा कार्यक्षेत्रातील सातपूर-अंबड लिंकरोड परिसर, जेलरोड परिसर, इंदिरानगर परिसर व पाथर्डी फाटा परिसरात जास्त रु ग्ण आढळून आले आहेत, त्यामुळे आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली.
गेल्या सहा महिन्यांत शहरात हिवतापाचा एकच रु ग्ण आढळला असून, पंधरा रुग्ण चिकुनगुण्याचे आढळले आहेत. त्या तुलनेत डेंग्यू रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली. तसेच डास नियंत्रणाच्या दृष्टीने गोठेधारकांवर कारवाई करणे, घरात व घरपरिसरात डास उत्पत्ती आढळल्यास नागरिकांना नोटिसा बजावाव्यात. नवीन बांधकामामध्ये पाणी साठणार नाही याची दक्षता घेणे, पाणी साठत असलेल्या तळघरांमध्ये कार्यवाही करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
मनपा मिळकतींची दक्षता, पोलिसांना कळविणार
महापालिकेच्या वतीने डेंग्यू डासांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी आयुक्तांनी विविध उपाय करण्यास सांगितले असून, जनप्रबोधन करतानाच महापालिका मिळकतींच्या छतावर पाणी साचू न देण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. शिवाय नळाचे खड्डे बंद करण्यात येणार असून, अस्वच्छ पोलीस वसाहतीबाबतीत पोलीस आयुक्तांना कळवण्यास सांगितले आहे. जास्त डेंग्यू रुग्ण आढळलेले शहरी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांना पत्र देण्याचेही आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
आरोग्य समितीतही जोरदार चर्चा
महापालिकेच्या आरोग्य सहाय्य समितीची बैठक बुधवारी (दि.११) घेण्यात आली. सभापती सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शहरातील रोगराईवर जोरदार चर्चा झाली. यावेळी छतावर व तळघरांमध्ये पाणी साचले असल्यास त्या मिळकतधारकांना दंडात्मक कारवाईच्या नोटिसा देण्याचे ठरविण्यात आले. तसेच मोकळ्या जागेत अस्वच्छता असल्यास त्यांनाही नोटिसा बजावण्याचे ठरविण्यात आले.
शहरात वाढली रोगराई
शहरात गेल्या आठवडाभरात महापालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये तसेच शहरी आरोग्य केंद्रात येणाºया रुग्णांची संख्या वाढली असून, वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार डेंग्यूचे १६ रुग्ण, तापाचे ४७३, विषमज्वरचे १० आणि काविळीचे तीन रुग्ण आढळले आहेत.

Web Title:  Notice to municipal corporation to send water if water gets set

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.