तळघर अस्वच्छ ठेवणाºयांना महापालिकेकडून नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 01:08 AM2017-08-11T01:08:48+5:302017-08-11T01:08:57+5:30
पश्चिम प्रभागात साचलेल्या पाण्यात डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होत असून, पालिकेने त्याची दखल घ्यावी यासाठी अस्वच्छ ठिकाणी आरोग्याधिकाºयांची प्रतिमा लावण्याचा इशारा प्रभाग समितीच्या बैठकीत दिल्यानंतर यंत्रणा कामाला लागली आहे. यंत्रणेने तातडीने अस्वच्छ तळघरे ठेवणाºयांना नोटिसा बजावण्यास प्रारंभ केला आहे.
नाशिक : पश्चिम प्रभागात साचलेल्या पाण्यात डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होत असून, पालिकेने त्याची दखल घ्यावी यासाठी अस्वच्छ ठिकाणी आरोग्याधिकाºयांची प्रतिमा लावण्याचा इशारा प्रभाग समितीच्या बैठकीत दिल्यानंतर यंत्रणा कामाला लागली आहे. यंत्रणेने तातडीने अस्वच्छ तळघरे ठेवणाºयांना नोटिसा बजावण्यास प्रारंभ केला आहे.
गेले दोन महिने शहरात झालेल्या पावसानंतर शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले होते. मुख्य रस्त्यांवरील पाण्याचा निचरा झाला असला तरी अनेक व्यापारी संकुले आणि अन्य इमारतींच्या तळघरांमध्ये पाणी साचले असून, त्यात डासांची उत्पत्ती होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पश्चिम प्रभागाच्या समितीच्या बैठकीत जोरदार चर्चा करण्यात आली. आरोग्य विभाग अशाप्रकारे साचलेल्या पाण्याकडे दुर्लक्ष करीत असल्यानेच डासांचा उपद्रव वाढल्याचा आरोप करण्यात आला. त्याचप्रमाणे त्वरित स्वच्छ न केल्यास आरोग्याधिकाºयांचे छायाचित्र लावण्याचा इशारा प्रभाग समितीच्या सभापती डॉ. हेमलता पाटील यांनी दिला होता. दरम्यान, या प्रकारानंतर महापालिकेच्या पश्चिम विभागाने आरोग्याधिकाºयांवरील संकट टाळण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून, खासगी मिळकतीत पाणी साचले असेल अशा मिळकती शोधून नोटिसा दिल्या जात आहेत. गुरुवारी सभापती डॉ. पाटील आणि सदस्यांनी या नोटिसींचा आढावा घेतला. आरोग्य विभागाला सुधारणा करण्यासाठी आणखी तीन ते चार दिवसांची मुदत देण्यात आली असून, त्यानंतर जेथे अस्वच्छता आणि साचलेल्या पाण्यात डासांची निर्मिती होतांना आढळेल अशा ठिकाणी आरोग्याधिकाºयांची छबी असलेले बॅनर्स लावण्यात येणार आहे. त्यासाठी बॅनर्सही तयार करण्यात आल्याची माहिती डॉ. पाटील यांनी दिली.