सूचना- मजकूर कट होतो. वाचता येत नाही. दोन रेमडेसिविरची ५४ हजारांना विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:14 AM2021-05-15T04:14:18+5:302021-05-15T04:14:18+5:30
पंचवटी : कोरोना संकटाचा गैरफायदा घेत कोरोना बाधित रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनची काळ्याबाजारात दोन इंजेक्शन ५४ हजार रुपये ...
पंचवटी : कोरोना संकटाचा गैरफायदा घेत कोरोना बाधित रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनची काळ्याबाजारात दोन इंजेक्शन ५४ हजार रुपये एवढ्या ज्यादा दराने विक्री करणाऱ्या तीन नर्ससह एका औषधांच्या दुकानातील कर्मचाऱ्यास पोलिसांनी गुरुवारी (दि.१३) रात्री अटक केली आहे. या चौघांनाही पोलिसांनी न्यायालयात हजर केले असून न्यायालयाने चौघांचीही चार दिवसासाठी पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागासह आडगाव पोलिसांनी आडगाव शिवारात गुरुवारी रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास कारवाई करीत ५४ हजार रुपयांना दोन इंजेक्शन विक्री करणाऱ्या तीन नर्ससह चौघांच्या टोळीचा पर्दाफाश केला. पोलिसांनी संशयिकांकडून दोन इंजेक्शन जप्त केले असून, चौघांनाही अटक केली आहे.शहरातील एका हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या महिला नर्स सिडकोतील मेडिकल दुकानात काम करणाऱ्या युवकाच्या मध्यस्थीने रेमडेसिविर इंजेक्शनची काळ्या बाजारात वाढीव किंमतीने विक्री करीत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख यांना मिळाली होती. या गुन्ह्याच्या सुगावा लागताच त्यांनी त्यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे निरीक्षक सुरेश देशमुख यांच्या मदतीने इंजेक्शन खरेदीसाठी कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालयासमोर सापळा लावला. यावेळी जत्रा हॉटेल चौकाजवळ राहणाऱ्या संशयित जागृती शरद शार्दुल (२१), श्रुती रत्नाकर उबाळे (२१) या दोघींना रेमडेसिविर इंजेक्शनची विक्री करताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. त्यांची चौकशी केली असता त्यांना स्नेहल अनिल पगारे (२२, रा. शांतीनगर मनमाड ) व कामेश रविंद्र बच्छाव (२२, उदय कॉलनी , नाशिक ) हे इंजेक्शन उपलब्ध करून देत असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी उर्वरीत दोघांनाही अटक केली असून त्यांच्याकडून दोन रेमडेसिविर इंजेक्शन, मोबाईल , स्कूटी असा एकूण ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. दरम्यान, अटक केलेल्या चौघाही संशयितांना पोलिसांनी शुक्रवारी न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालयाने चौघांनाही सोमवारपर्यंत (दि.१७) पोलीस कोठडी सुनावल्याची मोाहिती पोलिसांनी दिली.