अनधिकृतरीत्या मुरूम साठा प्रकरणी नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2019 09:49 PM2019-11-28T21:49:06+5:302019-11-28T21:51:31+5:30
मालेगाव : संगमेश्वरातील सर्व्हे क्रमांक ७० मधील ३८.४० वरील मिळकतीवर अनधिकृतरीत्या १९६ ब्रास मुरूम साठविणाऱ्या व यापोटी झालेल्या १० लाख ५८ हजार ४०० रुपये दंड भरण्यास टाळाटाळ करणाºया ललित सखाराम घोडके यांना येथील तहसील कार्यालयाने बोजा दाखल करण्याची नोटीस बजावली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

८ नोव्हेंबर २०१७ रोजी संगमेश्वरातील गट क्रमांक ७० वर १९६ ब्रास मुरूम साठवून ठेवल्याचे उघडकीस आले होते. महसूल विभागाने पंचनामा करून १० लाख ५८ हजार ४०० रुपये दंड करून सात दिवसांच्या आत दंडाची रक्कम भरण्याचे आदेश दिले होते; मात्र घोडके यांनी दंडाची रक्कम भरण्यास टाळाटाळ केली. या पार्श्वभूमीवर तहसीलदार चंद्रजित राजपूत घोडके यांना अनधिकृत गौण खनिज वसुलीसाठी मिळकतीवर थकीत रकमेचा बोजा दाखल करण्यात येईल, अशी नोटीस बजावली आहे.तहसीलदार चंद्रजीत राजपूत यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. संगमेश्वरच्या तलाठ्यांना ३८.४० क्षेत्राच्या मिळकतीवर थकीत बोजा दाखल करावा, अशी सूचना केली.