४७ हजार मिळकतधारकांना नोटिसा घरपट्टी वसुली : ४४ कोटी रुपयांची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 12:04 AM2017-12-01T00:04:08+5:302017-12-01T00:11:06+5:30

महापालिकेच्या करवसुली विभागाने शहरातील ४४ हजार ४७५ मिळकतधारकांना घरपट्टी थकबाकी वसुलीसाठी अंतिम नोटिसा बजावण्यास सुरुवात केली

Noticea property tax recoveries to 47 thousand beneficiaries: outstanding of Rs 44 crores | ४७ हजार मिळकतधारकांना नोटिसा घरपट्टी वसुली : ४४ कोटी रुपयांची थकबाकी

४७ हजार मिळकतधारकांना नोटिसा घरपट्टी वसुली : ४४ कोटी रुपयांची थकबाकी

Next
ठळक मुद्दे४४ कोटी ५६ लाख रुपयांची थकबाकी जप्तीची कारवाई केली जाणारघरपट्टी वसुलीच्या अंतिम नोटिसा

नाशिक : महापालिकेच्या करवसुली विभागाने शहरातील ४४ हजार ४७५ मिळकतधारकांना घरपट्टी थकबाकी वसुलीसाठी अंतिम नोटिसा बजावण्यास सुरुवात केली असून, सदर मिळकतधारकांकडे ४४ कोटी ५६ लाख रुपयांची थकबाकी आहे. थकबाकी न भरणाºया मिळकतधारकांवर जप्तीची कारवाई केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मार्च २०१८ अखेर वसुलीसाठी महापालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत. सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात महापालिकेने १०० कोटी रुपये घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. ३० नोव्हेंबर अखेर ६० कोटी ३ लाख ६४ हजार रुपयांची घरपट्टी वसूल केलेली आहे. चार महिन्यांत आणखी ४० कोटी रुपये वसुलीचे आव्हान महापालिकेसमोर आहे. महापालिकेच्या कर वसुली विभागाने आता ४७ हजार ४७५ मिळकतधारकांना घरपट्टी वसुलीच्या अंतिम नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे. थकबाकीदारांकडे ३१ कोटी ६७ लाख रुपयांची थकबाकी असून, चालू मागणी १२ कोटी ८८ लाख रुपये आहे. एकूण ४४ कोटी ५६ लाख रुपयांची वसुली करण्याचे आव्हान आहे.
नोटिसा बजावल्यानंतर संबंधितांनी मुदतीत थकबाकीचा भरणा न केल्यास मिळकतींवर जप्तीची कारवाई केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, महापालिकेच्या घरपट्टी व पाणीपट्टी वसुली विभागातील बव्हंशी कर्मचाºयांना निवडणुकीविषयक कामाचा भार देण्यात आल्याने वसुलीत अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे मार्चअखेर उद्दिष्ट गाठण्याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

Web Title: Noticea property tax recoveries to 47 thousand beneficiaries: outstanding of Rs 44 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.