गैरहजर ८९ अधिकारी, कर्मचाऱ्यांना नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2019 01:37 AM2019-10-02T01:37:38+5:302019-10-02T01:38:07+5:30
भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिंडोरी-पेठ विधानसभा मतदारसंघातील मतदान कामकाजासाठी नियुक्त कर्मचाºयांचे प्रशिक्षण पार पडले. उपविभागीय अधिकारी डॉ. संदीप आहेर, तहसीलदार कैलास पवार, संदीप भोसले, निवडणूक शाखेचे नायब तहसीलदार आबासाहेब तांबे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
दिंडोरी : भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिंडोरी-पेठ विधानसभा मतदारसंघातील मतदान कामकाजासाठी नियुक्त कर्मचाºयांचे प्रशिक्षण पार पडले. उपविभागीय अधिकारी डॉ. संदीप आहेर, तहसीलदार कैलास पवार, संदीप भोसले, निवडणूक शाखेचे नायब तहसीलदार आबासाहेब तांबे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
निवडणूक निर्णय अधिकारी संदीप आहेर यांनी सांगितले की, लोकशाही भक्कम करण्यासाठी शांततेच्या वातावरणात विधानसभा निवडणूक पार पाडण्याकरिता कर्मचाºयांची नियुक्ती झाली असून, कोणीही निवडणुकीचा आदेश रद्द करण्याचा प्रयत्न करू नये व मानसिक दबावाखाली काम न करता सर्व माहिती नीट समजून घेऊन कामकाज करावे. यावेळी दिंडोरी मतदारसंघासाठी ३०८० कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी ८९ अधिकारी, कर्मचारी गैरहजर होते. त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात येणार असून, त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहितीही निवडणूक निर्णय अधिकारी संदीप आहेर यांनी दिली.
निवडणूक कामकाजात कोणतीही दिरंगाई सहन केली जाणार नाही. कर्मचाºयांनी नेमून दिलेली जबाबदारी योग्य रितीने पार पाडावी. जे कर्मचारी कामकाजात टाळाटाळ करतील त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी कर्मचाºयांना प्रशिक्षण देण्यात आले.
गटविकास अधिकारी चंद्रकांत भावसार, पल्लवी जगताप, संघमित्रा बाविस्कर आदी यावेळी उपस्थित होते.