अडवणूक करणाऱ्या महाविद्यालयांना नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 12:48 AM2019-07-16T00:48:17+5:302019-07-16T00:48:37+5:30
तंत्रशिक्षण विद्याशाखेच्या पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती महाविद्यालयांना प्राप्त झालेली नसल्याने विद्यार्थ्यांचे स्थलांतर प्रमाणपत्र (ट्रान्सफर सर्टिफिकेट) रोखून अडवणूक करून पालकांक डून शैक्षणिक शुल्कांची मागणी करणाºया महाविद्यालयांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात येणार आहे.
नाशिक : तंत्रशिक्षण विद्याशाखेच्या पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीमहाविद्यालयांना प्राप्त झालेली नसल्याने विद्यार्थ्यांचे स्थलांतर प्रमाणपत्र (ट्रान्सफर सर्टिफिकेट) रोखून अडवणूक करून पालकांक डून शैक्षणिक शुल्कांची मागणी करणाºया महाविद्यालयांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती महाविद्यालयांना प्राप्त झालेली नसल्याने महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांचे स्थलांतर प्रमाणपत्र (ट्रान्सफर सर्टिफिकेट) रोखून अडवणूक होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने रविवारी (दि.१४) प्रसिद्ध केल्यानंतर समाज कल्याण विभागाने या वृत्ताची गंभीर दखल घेतली आहे़ विद्यार्थ्यांनी तक्रार केल्यास संबंधित महाविद्यालयांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात येणार असल्याची माहिती समाज कल्याण विभागाच्या अधिकारी वैशाली टाके यांनी दिली.
तंत्रशिक्षण विद्याशाखेच्या पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना अंतिम परीक्षेत उत्तीर्ण होऊनही अभियांत्रिकीच्या थेट द्वितीय वर्षाच्या प्रवेशप्रक्रियेत टीसीअभावी अडसर निर्माण होत आहे.
शासनाने महाविद्यालयांनो शिष्यवृत्तीची रक्कम वर्ग केली नसल्याने महाविद्यालयांनी संबंधित विद्यार्थ्यांचे शुल्क थकीत असल्याचे दाखवत विद्यार्थ्यांचे दाखले रोखले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभियांत्रिकी पदवीच्या थेट द्वितीय वर्ष प्रवेशाच्या मार्गात अडसर
निर्माण झाल्याने पालकांकडून अडचणीच्या काळात पैशाची जमावाजमव करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क पूर्ण करून द्यावे लागत असल्याचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केल्यानंतर अशाप्रकारे विद्यार्थ्यांची अडवणूक करणाºया महाविद्यालयांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे समाज कल्याण विभागाकडून सोमवारी (दि.१५) स्पष्ट करण्यात आले.
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे निवेदन
शिष्यवृत्तीस पात्र विद्यार्थ्यांकडून महाविद्यालांनी घेतलेली रक्कम परत करण्याची मागणी करीत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्तांना निवेदन देऊन संबंधित महाविद्यालयांवर कारवाईची मागणी केली. यावेळी सहायक आयुक्तांच्या अनुपस्थित विभागाच्या अधिकारी वैशाली टाके यांनी विद्यार्थ्यांचे निवेदन स्वीकारून यासंदर्भात कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहर सचिव संकेत गायकवाड, धनंजय भालेराव, चेतन क्षीरसागर, योगेश जाधव यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.
शिष्यवृत्ती मिळण्यास उशीर होत असल्याने विद्यार्थ्यांची अडवणूक होऊ नये यासाठी समाज कल्याण विभागातर्फे विशेष परिपत्रक काढण्यात येणार असल्याचे समाज कल्याण विभागाकडून सांगण्यात आले आहे.