गटशिक्षणाधिकाºयांना बजावल्या नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 11:59 PM2017-08-19T23:59:29+5:302017-08-20T00:18:16+5:30
नाशिक : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना १५ आॅगस्टपर्यंत गणवेशवाटप प्रक्रि या राबवून त्यांचा अहवाल शिक्षण विभागास सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र, जिल्ह्णातील एकाही गटशिक्षणाधिकाºयांनी अहवाल सादर केलेला नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या प्राथमिक शिक्षण विभागाने माहिती सादर न करणाºया १५ गटशिक्षणाधिकाºयांना नोटिसा बजावल्याचे वृत्त आहे.
नाशिक : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना १५ आॅगस्टपर्यंत गणवेशवाटप प्रक्रि या राबवून त्यांचा अहवाल शिक्षण विभागास सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र, जिल्ह्णातील एकाही गटशिक्षणाधिकाºयांनी अहवाल सादर केलेला नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या प्राथमिक शिक्षण विभागाने माहिती सादर न करणाºया १५ गटशिक्षणाधिकाºयांना नोटिसा बजावल्याचे वृत्त आहे. प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत असलेल्या तीन हजार ३३७ प्राथमिक शाळांमधील दोन लाख ८६ हजार विद्यार्थ्यांना दोन गणवेशासाठी शिक्षण विभागाने नऊ कोटी ७६ लाख ३८ हजारांचा निधी वर्ग केला आहे. यंदा विद्यार्थ्यांच्या खात्यावर थेट निधी जमा करून गणवेश खरेदी होणार आहे. यासाठी पालकांनी त्यांच्या पाल्यांना गणवेश खरेदी करून दिल्यानंतर त्याचे देयके शाळेत सादर करायचे आहे. त्यानंतर पालक व विद्यार्थ्यांच्या संयुक्त खात्यावर गणवेशाची चारशे रु पये रक्कम जमा होणार आहे. मात्र, शाळा सुरू होऊन दोन महिन्यांचा कालवधी लोटला, स्वातंत्र्य दिन उजाडला तरी विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेले नाही. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी शिक्षण विभागाने केलेले दुर्लक्ष, जिल्हा बँकेची आर्थिक डबघाईस आलेली स्थिती व पालक-विद्यार्थ्यांचे संयुक्त खाते उघडण्यास पुरेशी नसलेली राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखांची संख्या यामुळे निम्म्याहून अधिक विद्यार्थ्यांचे खाते उघडण्यात आलेले नाही. त्यातल्या काहींनी गणवेश खरेदी करून बिल सादर केले आहे. मात्र, आतापर्यंत केवळ १८ हजार विद्यार्थ्यांच्या गणवेशाची रक्कम बँक खात्यात जमा झाली आहे. स्वातंत्र्यदिनापर्यंत विद्यार्थ्यांचे खाते उघडून त्यांची गणवेश खरेदी होऊन त्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्याच्या सूचना शिक्षणविभागाने दिल्या होत्या. याबाबतचा अहवालही सादर करण्याचे आदेश गटशिक्षणाधिकाºयांना देण्यात आले होते. प्रत्यक्षात, स्वातंत्र्य दिन होऊनदेखील तालुकास्तरावरून अहवाल प्राप्त झालेला नाही. तसेच शिक्षण विभागाच्या पत्राला उत्तरदेखील देण्यात आलेले नसल्याचे समोर आले आहे. यामुळे संतप्त झालेल्या प्रभारी प्राथमिक शिक्षणाधिकाºयांनी या सर्व गटशिक्षणाधिकाºयांना नोटिसा पाठवून दिलेली जबाबदारी पार न पाडल्याबद्दल आपणाविरोधात कारवाई प्रस्तावित करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.