मुद्रणालयात नोटा छपाई कामाचे आॅडिट
By Admin | Published: March 27, 2017 01:08 AM2017-03-27T01:08:50+5:302017-03-27T01:09:07+5:30
नाशिकरोड : नोटाबंदीच्या काळात नाशिकरोडच्या करन्सी नोटप्रेसमध्ये झालेल्या नव्या चलनातील नोटा छपाई कामाचे आॅडिट मुद्रणालय महामंडळाकडून करण्यात आल्याचे वृत्त आहे.
नाशिकरोड : नोटाबंदीच्या काळात नाशिकरोडच्या करन्सी नोटप्रेसमध्ये झालेल्या नव्या चलनातील नोटा छपाई कामाचे आॅडिट मुद्रणालय महामंडळाकडून करण्यात आल्याचे वृत्त आहे. रविवारी अधिकाऱ्यांनी नोटा छपाई आणि त्यावरील खर्च त्याबरोबरच सद्यस्थितीतील यंत्रे याबाबतची माहिती जाणून घेतल्याचे समजते. मुद्रणालय महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीण गर्ग, तंत्रज्ञ संचालय अजय श्रीवास्तव यांनी रविवारी चलार्थ पत्र व भारत प्रतिभूती या दोन्ही मुद्रणालयांस भेट देऊन पाहणी करून माहिती घेतली.
केंद्र शासनाच्या नोटाबंदी निर्णयाच्या पूर्वी चलार्थ पत्र मुद्रणालयात तेव्हाच्या काळात ५०० व एक हजाराच्या नोटा छापून तयार होत्या. रविवारी गर्ग व श्रीवास्तव यांनी चलार्थपत्र मुद्रणालयास भेट देऊन ५०० व हजार रुपयांच्या छापून तयार असलेल्या नोटा व नोटा छापण्यासाठी झालेला खर्च याची माहिती घेतल्याचे वृत्त आहे. तसेच मुद्रणालयातील यंत्रांची स्थिती आणि नवीन यंत्रांची गरज यांची माहिती घेतली. त्यानंतर दुपारी गर्ग व श्रीवास्तव यांनी भारत प्रतिभूती मुद्रणालयास भेट देऊन विभागवार पाहणी केली. तेथेही यंत्रांची परिस्थिती व कामकाजाची माहिती घेतली. यावेळी दोन्ही मुद्रणालयांचे महाप्रबंधक सुधीर साहू, एस. के. वर्मा इतर वरिष्ठ अधिकारी, मुद्रणालयाच्या मजदूर संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.