गैरहजर सफाई कर्मचाºयांना बजावल्या नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 01:09 AM2018-01-03T01:09:13+5:302018-01-03T01:11:30+5:30
नाशिक : महापौर रंजना भानसी यांनी मंगळवारी (दि.२) सकाळी पंचवटी भागात अचानक पाहणी दौरा करत स्वच्छतेच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी लेटलतिफ आणि गैरहजर राहणाºया सफाई कामगारांसह गोदाघाटावरील सुरक्षारक्षकांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्याचे आदेश महापौरांनी प्रशासनाला दिले.

शहरात येत्या ४ जानेवारीपासून स्वच्छता सर्वेक्षणास प्रारंभ होणार आहे. नाशिक शहर हे स्वत: मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतले असल्याने यंदा स्वच्छ सर्वेक्षणात कामगिरी उंचावण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे. त्या पार्श्वभूमीवर महापौर रंजना भानसी यांनी मंगळवारी पंचवटी भागात अचानक पाहणी दौरा करत स्वच्छतेच्या कामांचा आढावा घेतला.
महापौरांनी सकाळी ७ वाजेच्या सुमारास सफाई कामगारांच्या हजेरी शेडकडेच मोर्चा वळविला. यावेळी त्यांना अनेक कर्मचारी गैरहजर आढळून आले. गंगाघाटावरील हजेरी शेडवर २६ पैकी ७, इंदिरा गांधी शेडवर २४ पैकी ७, संजयनगर येथे २१ पैकी २ तर फुलेनगर येथेही २८ पैकी ७ सफाई कामगार कामावर हजर नसल्याचे निदर्शनास आले तर काही सफाई कामगार उशिराने कामावर हजर झाले. महापौरांनी हजेरी शेडवर अचानक भेट देताच मुकादमची तारांबळ उडाली आणि दूरध्वनी करत कामगारांना बोलावून घेण्यात आले.