घोटी ग्रामपालिकेतर्फे दुकानदारांना नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 09:55 PM2020-03-19T21:55:30+5:302020-03-20T00:12:11+5:30
घोटी : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी येथील बाजाराच्या दिवशी होणाºया गर्दीसाठी खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामपालिकेने घोटी शहरातील व्यापारी, दुकानदार, हॉटेल्स ...
घोटी : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी येथील बाजाराच्या दिवशी होणाºया गर्दीसाठी खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामपालिकेने घोटी शहरातील व्यापारी, दुकानदार, हॉटेल्स यांना नोटिसा जारी केल्या आहेत.
इगतपुरी तालुक्यातील सर्वात मोठी व्यापारी बाजारपेठ असलेल्या घोटी शहरात मुंबईसह ठाणे, नाशिक, नगर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात व्यापारासाठी नागरिक येतात. तसेच इगतपुरी तालुक्यातील ११० हून अधिक गावांतील शेतकरीवर्ग मोठा असल्याने शनिवारी होणारी बाजाराच्या गर्दीची खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामपालिकेने घोटी शहरातील व्यापारी, दुकानदार, हॉटेल्स यांना नोटिसा जारी केल्या आहेत.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यानुसार जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार ग्रामपालिकेने दि. २० ते ३१ मार्च पर्यंत घोटी गावातील मंगल कार्यालये, लॉन्स, किराणा दुकाने, सराफ दुकाने, कापड दुकाने, हॉटेल्स, रेस्टॉरंट, कृषी सेवा केंद्रे, पान स्टॉल, तसेच व्यापारी बाजारपेठेतील दुकाने पूर्णत: बंद ठेवण्यात यावी असे आवाहन नोटिसीद्वारे करण्यात आले आहे. सदर नोटिसीचे पालन न करणाºया दुकानदारावर कार्यवाही करण्यात येईल. असे नोटिसीत म्हटले आहे. ग्रामीण भागातून घोटी शहरात येण्यासाठी अवैध वाहतूक होत असून, ती वाहतूक थांबवावी
अशी मागणी करण्यात आली
आहे.
घोटी ही मोठी व्यापारी बाजारपेठ असल्याकारणाने तिन जिल्ह्यांतून दररोज हजारो लोकांची ये-जा मोठ्या प्रमाणात असते. कोरोनाचा प्रादुर्भाव शहरात होऊ नये याकरिता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ग्रामपालिकेने काही ठोस पावले उचलली असून, शनिवार आठवडे बाजारासह ३१ मार्चपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामपालिकेच्या वतीने दुकानदारांना नोटिसा देऊन घेण्यात आला आहे. ग्रामपालिकेस व्यापारीवर्गांने आपली दुकाने बंद ठेवून होणाºया प्रादुर्भावास रोखण्यासाठी सहकार्य करावे.
- संजय आरोटे, प्रभारी सरपंच, घोटी