पाच खातेप्रमुखांसह दहा जणांना नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 12:59 AM2018-06-05T00:59:22+5:302018-06-05T00:59:22+5:30
नागरिकांच्या तक्रारींची दखल न घेणे बड्या अधिकाऱ्यांना महागात पडले असून, पाच खातेप्रमुख तसेच अन्य पाच अधिकाºयांना प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी बी राधाकृष्णन यांनी नोटिसा बजावल्या आहेत. यामध्ये उपआयुक्त रोहिदास बहिरम, नगररचना विभागाचे सहसंचालक आकाश बागुल, शहर अभियंता संजय घुगे यांचादेखील समावेश आहे.
नाशिक : नागरिकांच्या तक्रारींची दखल न घेणे बड्या अधिकाऱ्यांना महागात पडले असून, पाच खातेप्रमुख तसेच अन्य पाच अधिकाºयांना प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी बी राधाकृष्णन यांनी नोटिसा बजावल्या आहेत. यामध्ये उपआयुक्त रोहिदास बहिरम, नगररचना विभागाचे सहसंचालक आकाश बागुल, शहर अभियंता संजय घुगे यांचादेखील समावेश आहे. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी महापालिकेने ई कनेक्ट अॅप तयार केले असून, त्यातील तक्रारींची सात दिवसांच्या आत सोडवणूक करणे गरजेचे आहे. तसे न केल्यास कनिष्ठ अधिकाºयांना आॅटो जनरेटेड नोटिसा बजावल्या जातात. परंतु वरिष्ठ अधिकारीच नव्हे तर खाते प्रमुखांनादेखील खाते आयुक्त आढावा घेतात. त्यानुसार महापालिकेच्या एनएमसी ई कनेक्ट अॅपच्या तक्र ारीकडे दुर्लक्ष करणाºया अधिकाºयांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्याचे आदेश प्रभारी आयुक्तांनी दिले आहेत. सध्या महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे रजेवर असून, त्यांनी प्रभारी आयुक्त राधाकृष्णन यांना तक्रारींचा आढावा घेण्यास सांगितले त्यानुसार आढावा घेऊन त्यांनी नोटिसा बजावण्याचे आदेश दिले होते.
यात नगररचना विभागाचे सहसंचालक आकाश बागुल, अतिक्र मण विभागाचे उपायुक्त रोहिदास बहिरम, आरोग्य व वैद्यकीय विभागाचे अधिकारी डॉ. जयराम कोठारी, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. सचिन हिरे, शहर अभियंता संजय घुगे व पालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापक उपायुक्त रोहिदास बहिरम यांचा समावेश आहे. याशिवाय सात दिवस उलटूनही तक्र ार प्रलंबित असल्याने सातपूर, सिडको, पश्चिम व पूर्व, नाशिकरोड, पंचवटी विभागीय अधिकाºयांनादेखील नोटीस बजावली जाणार आहे.