द्वारका भुयारी मार्गाचा वापराबाबत लवकरच अधिसूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 04:30 AM2020-12-13T04:30:42+5:302020-12-13T04:30:42+5:30
शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असून शहर वाहतुकीच्या समस्या जटील होऊ नये, यासाठी विविध उपाययोजना व सिग्नलवरील व्यवस्थापन अचुक ...
शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असून शहर वाहतुकीच्या समस्या जटील होऊ नये, यासाठी विविध उपाययोजना व सिग्नलवरील व्यवस्थापन अचुक व्हावे, जेणेकरुन वाहतुकीचा गोंधळ निर्माण होणार नाही, यादृष्टीने पाण्डेय यांनी शनिवारी शहरातील द्वारकेसह युनीट-२मधील काही प्रमुख चौकांना भेट दिली. चौकांमध्ये थांबून वाहतुकीचे निरिक्षण केले तसेच सिग्नलची वेळमर्यादा वाहतुक नियमांबाबतचे विविध माहितीपर फलकांच्या अवस्थेकडेही त्यांनी संबंधितांचे लक्ष वेधले.
उंटवाडी रस्त्यावरील सिटी सेंटर मॉलजवळील सिग्नल, त्र्यंबकरोड-महात्मानगर रस्त्याला जोडणारा एबीबी सिग्नल, भोसला महाविद्यालयाकडे जाणारा गंगापुररोडवरील जेहान सिग्नलसह मुंबईनाका सर्कल, कोणार्कनगर चौफुली आदि ठिकाणी पाण्डेय यांनी सकाळी अकरा ते दुपारी दोन वाजेपर्यंत पाहणी दौरा केला. यावेळी त्यांनी वाहतुक शाखेचे अंमलदार, कर्मचारी यांच्याशीही संवाद साधला. त्यांना भेडसावणाऱ्या अडीअडचणी जाणून घेत त्याचे तत्काळ निराकरण करण्याच्या सुचना प्रशासनाला दिल्या. यावेळी शहर वाहतुक नियंत्रण शाखेच्या उपायुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी, पाेलीस निरिक्षक विजय ढमाळ आदि उपस्थित होते.
--इन्फो--
लक्झरी बसेसच्या थांब्यांबाबत आरटीओला धाडणार पत्र
मुंबईनाका, त्र्यंबकनाका येथुन सर्रासपणे खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून भर रस्त्यात लांब पल्ल्याच्या लक्झरी बसेस उभ्या करुन प्रवाशी भरले जातात, याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून याप्रकरणी तत्काळ प्रादेशिक परिवहन विभागासोबत आयुक्तालयाकडून पत्रव्यवहार केला जाणार आहे. लक्झरी बसेसचा थांबा नेहमीच वादाचा मुद्दा ठरला आहे. द्वारका, मुंबईनाका, त्र्यंबकनाका, दिंडोरीनाका आदि ठिकाणी भर वर्दळीच्या रस्त्यांलगत वाहने उभी करुन प्रवाशांची चढ-उतार केली जात असल्याचे पाण्डेय यांच्या पाहणी दौऱ्यात निदर्शनास आल्याने त्यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
---इन्फो---
अंमलदारांसोबत ‘सीपीं’चे भोजन
शहर वाहतुक नियंत्रण शाखेचे पोलीस अंमलदार, वाहतुक कर्मचारी, उपनिरिक्षक यांच्यासोबत चक्क पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी दुपारचे भोजन घेतले. यामुळे पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. शहर पोलीस दलाच्या प्रमुखांनी चक्क आपल्यासोबत दुपारचे जेवण केल्यामुळे त्यांचाही आनंदाला पारावार राहिला नाही.
---
फोटो : १२पीएचडीसी७९/ ७६