ध्वजनिधी संकलनाची धकबाकी चार लाखांच्या घरात नऊ गटविकास अधिकाऱ्यांना नोटिसा : पाच वर्षांची थकबाकी

By admin | Published: December 10, 2014 01:26 AM2014-12-10T01:26:50+5:302014-12-10T01:27:35+5:30

ध्वजनिधी संकलनाची धकबाकी चार लाखांच्या घरात नऊ गटविकास अधिकाऱ्यांना नोटिसा : पाच वर्षांची थकबाकी

Notorious: Five-year-old dues | ध्वजनिधी संकलनाची धकबाकी चार लाखांच्या घरात नऊ गटविकास अधिकाऱ्यांना नोटिसा : पाच वर्षांची थकबाकी

ध्वजनिधी संकलनाची धकबाकी चार लाखांच्या घरात नऊ गटविकास अधिकाऱ्यांना नोटिसा : पाच वर्षांची थकबाकी

Next

  नाशिक : सशस्त्र सेना ध्वजनिधी संकलनापोटी २००७ ते २०११ या पाच वर्षांत गोळा केलेला ध्वजनिधी आणि ध्वजनिधी साहित्य वारंवार कळवूनही जमा न केल्याने जिल्'ातील नऊ गटविकास अधिकाऱ्यांना प्राथमिक शिक्षणाधिकारी रहीम मोगल यांनी कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. बागलाण, देवळा, चांदवड,बागलाण, कळवण, निफाड व मालेगाव वगळता अन्य सर्व नऊ तालुक्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांना तसेच माध्यमिक शिक्षणाधिकारी, कार्यकारी अभियंता लघुपाटबंधारे पूर्व व पश्चिम, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण, कृषी अधिकारी, समाजकल्याण अधिकारी अशा एकूण २० खातेप्रमुखांकडे सन- २००७ ते २०११ पर्यंत एकूण ३ लाख ९४ हजार ५३० रुपयांची थकबाकी आहे. त्यात २००७ या सालातील १ लाख ४४०० इतकी थकबाकी, २००८ मधील ३७ हजार ८००, २००९ मधील ७५ हजार ७५०, सन-२०१० मधील १ लाख ९ हजार १६६, २०११ मधील ६७ हजार ४१४ रूपये अशी एकूण ३ लाख ९४ हजार ५३० इतकी थकबाकी असल्याचे आढळून आले असून, प्राथमिक शिक्षणाधिकारी रहीम मोगल यांनी जिल्हा सैनिकी कल्याण अधिकाऱ्यांचा हवाला देत ही थकबाकी तत्काळ भरण्याबाबत सर्वच खातेप्रमुखांना पत्र दिले आहे. तसेच नऊ गटविकास अधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. यात सर्वाधिक थकबाकी सुरगाणा गटविकास अधिकाऱ्यांकडे १ लाख ४७ हजार ५५० तसेच नाशिक गटविकास अधिकाऱ्यांकडे ९८ हजार १५० इतकी असल्याचे समजते. (प्रतिनिधी)

Web Title: Notorious: Five-year-old dues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.