आता अंत्यसंस्कारासाठीही आधार कार्ड सक्तीचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 12:19 AM2017-10-04T00:19:19+5:302017-10-04T00:19:25+5:30
नाशिक : केंद्र सरकारने सर्वच ठिकाणी आधार कार्ड सक्तीचे केले आहेत. परंतु एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरही अंत्यसंस्कारासाठी ते सक्तीचे करण्यात आहे. या अजब फतव्यामुळे आधार कार्डाशिवाय मोक्ष नाही, अशी स्थिती निर्माण झाली असल्याची तीव्र भावना व्यक्त होत आहे. यासंदर्भात जनक्षोभ लक्षात घेता सरकारने आधार कार्ड नसेल तर अर्जदाराला तसे प्रमाणपत्र देण्यास सांगावे आणि प्रमाणपत्रातील माहिती चुकीची निघाल्यास कारवाई होऊ शकते असे अवगत करण्याची सूचना देणारे पत्र मंगळवारी जारी केले आहे. त्यामुळे आधारकार्ड सादर न करणेदेखील तितकेच संकटात टाकणारे ठरले आहे.

केंद्र सरकारने आधारकार्ड योजना आणून अनेक वर्षे झाली तरी अद्यापही बहुतांशी नागरिकांकडे आधारकार्ड नाही. ज्यांच्याकडे आहे त्यांना बायोमेट्रिक म्हणजेच बोटांच्या ठशांची जुळणी होत नसल्याच्या किंवा अन्य तक्रारी आहेत. दुसरीकडे शासनाने सर्वच शासकीय योजनांसाठी आधारकार्ड सक्तीचे केले आहेच, शिवाय अमरधाममध्ये सक्तीचे केले आहेत. मृत व्यक्तीच्या नावाचे आधारकार्ड आवश्यक करण्यात आले असून, ते कार्ड नसेल तर मृत्यूचा दाखला मिळणार नाही असे सांगण्यात येते. त्यामुळे अनेक अडचणी उद््भवत आहेत. नाशिक महापालिकेच्या अमरधाममध्येही देखील आधारकार्ड सक्तीचे असून, ती माहिती न मिळाल्यास अनेक अडचणी येत आहेत. एखाद्या व्यक्तीकडे आधारकार्ड नसू शकते. त्याचप्रमाणे बाहेरगावाहून
आलेल्या व्यक्तीचे आपल्या नाशिक स्थित आप्तेष्टांकडे निधन झाल्यास त्याचे आधारकार्ड कोठून आणायचे? असा प्रश्न आहे. बेवारस मृतदेहांबाबत काय करायचे हादेखील प्रश्न आहे.
यासंदर्भात, कॉँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष वसंत ठाकूर यांनी या आडमुठेपणामुळे मृत व्यक्तीला मृत्यूनंतरही यातना सोसाव्या लागत आहेत. आधाराकार्ड नसेल तर मृत्यूचा दाखला नंतर मिळणार नाही, असे सांगितले जात असल्याचे ठाकूर यांनी सांगितले. आधारकार्ड नसल्याने कोठेही अंत्यसंस्कार करण्यास अडथळे आले नसले
तरी अमरधाममध्ये शोकाकूल वातावरणात असलेल्या
कुटुंबीयांनी आधारकार्ड शोधत आणायचे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राज्य शासनाच्या आरोग्य सेवा संचालकांनी मंगळवारी (दि.३) काढलेल्या आदेशात मृत व्यक्तीचे आधारकार्ड नसेल तर अर्जदाराकडून तसे प्रमाणपत्र घ्यावे आणि हे प्रमाणपत्र खोटे असल्याचे आढळले, तर जन्म-मृत्यू अधिनियमानुसार गुन्हा ठरू शकतो, असे संबंधितांना सूचित करावे, असे त्यात नमूद केले आहे.आधार कार्डची सक्ती डोकेदुखी ठरवणारीनाशिक महापालिकेच्या वतीने अमरधामध्ये मृत व्यक्तीची माहिती भरून घेण्याच्या अर्जात मृत व्यक्ती दारू किंवा तत्सम उत्तेजक पदार्थांचे सेवन करीत होते काय, पानसुपारी, सिगारेट, बिडीचे व्यसन होते काय, असल्यास किती वर्षे, अशाप्रकारची माहिती भरून घेतली जाते. सरकारने २०१२ पासूनच ही माहिती आवश्यक केल्याचे सांगितले जात असले तरी अशाप्रकारे प्रश्न मृत्यूनंतर विचारून काय साध्य होणार, असा प्रश्न केला जात आहे. त्यात आता आधारकार्डाची सक्तीही डोकेदुखी वाढविणारी ठरली आहे.