साधुग्रामनंतर आता ‘भाविकग्राम’निवाऱ्याची सोय

By admin | Published: January 30, 2015 12:27 AM2015-01-30T00:27:06+5:302015-01-30T00:27:09+5:30

४३ ठिकाणांची निश्चिती; कावनई, त्र्यंबकला निवाराशेड

Now after 'Sadhugram' the 'Bhavyakagram' facility is available | साधुग्रामनंतर आता ‘भाविकग्राम’निवाऱ्याची सोय

साधुग्रामनंतर आता ‘भाविकग्राम’निवाऱ्याची सोय

Next

  नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या साधु-महंतांसाठी तपोवनातील सुमारे पावणे तीनशे एकर जागेवर साधुग्रामची उभारणी केली जात असतानाच, या कुंभमेळ्यात पुण्य पदरात पाडून घेण्यासाठी कोट्यवधीच्या संख्येने येणाऱ्या भाविकांच्या निवाऱ्याचीही समस्या प्रशासनासमोर उभी ठाकली असून, त्यावर पर्याय म्हणून साधुग्राम प्रमाणेच ‘भाविकग्राम’ची निर्मितीचा विचार पुढे आला आहे.
ऐन पावसाळ्यातच सिंहस्थाच्या शाही पर्वण्या असल्यामुळे गोदावरीत पवित्र स्नानासाठी कोट्यवधी भाविक शहरात दाखल होणार आहेत. दोन दिवसांपूर्वी झालेल्या सिंहस्थ साप्ताहिक आढावा बैठकीत यावर चर्चा होऊन ज्या ठिकाणी वाहनतळाची व्यवस्था करण्यात येईल त्याच ठिकाणी भाविकग्रामची सोय करण्यावर एकमत झाले. त्यातही इगतपुरीच्या कावनई येथे दोन, त्र्यंबकेश्वर येथे आठ व नाशिक शहरालगतच्या पंधरा ठिकाणांवर ३३ ठिकाणी अशा ४३ ठिकाणांवर वाहनतळाशेजारीच निवाराशेड उभारण्यात येणार आहे.
शहरात येणाऱ्या प्रमुख रस्त्यांवर अंतर्गत व बाह्य वाहनतळाची उभारणी करण्यात येणार असून, त्यासाठी जवळपास आठशे एकर जागेची निकड आहे. अशा वाहनतळांवर प्रत्येक व्यक्तीस साधारणत: लागणाऱ्या जागेचा विचार करता, एकेका ‘भाविकग्राम’मध्ये तीनशे ते साडेतीनशे भाविकांची सोय होऊ शकते. त्यानुसार सुमारे दोन लाख भाविक सामावून घेण्याची क्षमता असलेले भाविकग्राम उभारण्याबाबत एस.टी. महामंडळ, रेल्वे, सार्वजनिक बांधकाम विभागाला अभ्यास करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पर्वणीच्या काळातच विशिष्ट मुदतीसाठी पाण्यापावसापासून बचाव करणारे व भाविकांना मूलभूत सुविधा पुरविणारे भाविकग्राम उभारण्यात येणार आहे. तात्पुरत्या स्वरूपातील भाविकग्राम मोफत उपलब्ध करून देण्यात येईल. (प्रतिनिधी)

Web Title: Now after 'Sadhugram' the 'Bhavyakagram' facility is available

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.