आजपासून सर्व विद्यार्थ्यांना अकरावीचे प्रवेश खुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 12:56 AM2019-08-27T00:56:44+5:302019-08-27T00:57:07+5:30
अकरावी प्रवेशासाठी पहिल्या तीन नियमित फेऱ्या पार व विशेष फेरीतील प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आतापर्यंत जवळपास १६ हजार विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाली आहेत. मात्र या सर्व फेऱ्यांमध्ये ज्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली नाही, त्यांच्यासाठी शिक्षण विभागातर्फे प्रथम येणाºयास प्रथम प्राधान्य या तत्त्वानुसार प्रवेशाची संधी देण्यात आली होती.
नाशिक : अकरावी प्रवेशासाठी पहिल्या तीन नियमित फेऱ्या पार व विशेष फेरीतील प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आतापर्यंत जवळपास १६ हजार विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाली आहेत. मात्र या सर्व फेऱ्यांमध्ये ज्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली नाही, त्यांच्यासाठी शिक्षण विभागातर्फे प्रथम येणाºयास प्रथम प्राधान्य या तत्त्वानुसार प्रवेशाची संधी देण्यात आली होती. ही मुदत सोमवारी (दि.२६) संपली असून, आता प्रवेश घेऊ न शकलेल्या सर्व विद्यार्थ्यांना अकरावीचे प्रवेश खुले करण्यात आले आहेत.
अकरावी प्रवेशप्रक्रियेच्या पहिल्या फेरीत १४ हजार ८४५ विद्यार्थ्यांची निवड झाली होती, तर दुसºया फेरीत ६ हजार ६४२ आणि तिसºया फेरीत ४ हजार १६१ विद्यार्थ्यांची निवड झाली होती. विशेष फेरीत ४ हजार १०७ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आली होती. यापैकी बहुतांश विद्यार्थ्यांनी पहिल्या व दुसºया फेरीत प्रथम पसंतीचे महाविद्यालयत निवडले, तर तिसºया आणि चौथ्या फेरीत मात्र उपलब्ध पर्यांयापैकी प्रथम पसंतीचे महाविद्यालय न मिळाल्याने दुसºया पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश निश्चित करून घेतल्याचे दिसून आले.
पहिल्या दोन फे ºयांनतर अकरावीचा कटआॅफ चांगलाच घसरल्याचे दिसून आले होते. त्यानंतर प्रथम येणाºयास प्रथम प्राधान्य या फेरीत सुरुवातीला ८० टक्के गुण असणाºया विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले. त्यानंतर ६० टक्के असणाºया विद्यार्थ्यांना २४ आॅगस्टपर्यंत प्रवेशाची संधी देण्यात आली होती. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता सोमवार (दि. २६) पासून दहावी उत्तीर्ण झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे.
दहावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या अनेक विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश घेण्याची इच्छा असून, त्यासाठी त्यांनी पुरवणी परीक्षाही दिली आहे. मात्र या परीक्षेता निकाल अद्याप जाहीर झाला नसल्याने विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा लागली आहे.