जनावरांसाठीही आता आधार नोंदणी आॅनलाइन : कानातल्या बिल्ल्याने जनावरांची तयार होणार ओळख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 01:13 AM2017-09-08T01:13:14+5:302017-09-08T01:14:19+5:30
माणसांप्रमाणे जनावरांना स्वत:ची ओळख निर्माण व्हावी यासाठी केंद्र शासनाने पशुसंवर्धन विभागाच्या मदतीने दुभत्या जनावरांच्या कानात बारा अंकी क्रमांक असलेले बिल्ले टोचून त्यांना ओळख देण्याचे महत्त्वकांक्षी पाऊल उचलले आहे. दुभत्या जनावरांच्या कानात बिल्ले टोचून त्याची आॅनलाइन नोंदणी करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे.
सिन्नर : माणसांप्रमाणे जनावरांना स्वत:ची ओळख निर्माण व्हावी यासाठी केंद्र शासनाने पशुसंवर्धन विभागाच्या मदतीने दुभत्या जनावरांच्या कानात बारा अंकी क्रमांक असलेले बिल्ले टोचून त्यांना ओळख देण्याचे महत्त्वकांक्षी पाऊल उचलले आहे. दुभत्या जनावरांच्या कानात बिल्ले टोचून त्याची आॅनलाइन नोंदणी करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे.
केंद्र शासनाने ‘इनाफ’ (आयएनएपीएफ) योजनेंतर्गत देशातील सर्व दुधाळ गायी व म्हशींना आधार नंबर देऊन तो नंबर त्यांच्या मालकाच्या आधार नंबर सोबत जोडण्याची योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेत जनावरांच्या कानात प्लॅस्टिकचा बिल्ला व त्यावर बारा अंकी नंबर असणार आहे. शक्यतो जनावरांच्या डाव्या कानात सदर बिल्ला टोचला जाणार आहे. सदर क्रमांक अन्य दुसºया जनावरांना येणार नाही. त्यामुळे या क्रमांकाने जनावरांना स्वत:ची ओळख निर्माण होणार आहे. जनावरांची आॅनलाइन नोंदणी झाल्यावर त्या जनावराच्या त्या जनावराच्या सर्व नोंदी आॅनलाईन होणार आहे. सर्व दुधाळ जनावरांची नोंदणी आॅनलाइन झाल्यानंतर शासनाच्या सर्व योजना जनावरांच्या आधार नंबर वर अवलंबून असतील अशी माहिती पशुसंवर्धन विभागाच्यावतीने देण्यात आली. पशुवैद्यकीय दवाखन्यात जनावरांना आणून त्यांच्या कानात बारावर बारा अंकी आधार नंबर टोचून मिळणार आहे. शक्यतो अगोदर दुधाळ व प्रजननक्षम जनावरांची नोंदणी केली जाणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व जनावरांची नोंदणी होईल. जनावरांच्या आॅनलाइन नोंदणीत मालकाचे नाव, मोबाइल नंबर व आधार नंबर असणार आहे. पशुवैद्यकीय विभागाचे कर्मचारी दैनंदिन काम सांभाळून सदर योजना राबविणार आहेत.
जिल्ह्णातील पहिली नोंदणी सिन्नरला
जनावरांच्या कानात बारा अंकी क्रमांक असलेले व स्वत:ची ओळख निर्माण करुन देण्याच्या या उपक्रमाचा सिन्नर तालुक्यातून शुभारंभ करण्यात आला. जिल्ह्णातील पहिली जनावरांची ओळख निर्माण करणारी आधार नोंदणी सिन्नर तालुक्यात झाली. आमदार राजाभाऊ वाजे, उदय सांगळे, पंचायत समिती सदस्य जगन्नाथ भाबड, गटविकास अधिकारी भारत धिवरे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. मिलिंद भणगे यांच्या उपस्थितीत जनावरांच्या कानात प्लास्टिकचा बारा अंकी क्रमांक असलेला बिल्ला टोचून या उपक्रमास प्रारंभ झाला.