आता अर्धी महासभा ऑनलाइन तर आर्धी ऑफलाइन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:14 AM2021-01-21T04:14:32+5:302021-01-21T04:14:32+5:30
गेेल्या वर्षी कोरेानामुळे मार्चनंतर महापालिकेचे कामकाज ठप्प झाले. एप्रिल आणि मे महिन्याची महासभा रद्द करण्याची वेळ महापौरांवर आली. त्यानंतर ...
गेेल्या वर्षी कोरेानामुळे मार्चनंतर महापालिकेचे कामकाज ठप्प झाले. एप्रिल आणि मे महिन्याची महासभा रद्द करण्याची वेळ महापौरांवर आली. त्यानंतर राज्यशासनाने महासभा किंवा महत्त्वाच्या बैठका ऑनलाइन पध्दतीने घेण्याची मुभा दिली. महासभा आणि स्थायी समितीच्या बैठका त्यानुसार होत असल्या तरी प्रत्यक्ष महासभा आणि ऑनलाइन महासभा यात मोठी तफावत आहे. मोबाइल आणि डेस्कटॉपवरून सभा चालवताना अनेक तांत्रिक अडचणी येतात. शिवाय कधी कधी तर पेाटतिडकीने प्रश्न मांडणारा नगरसेवक तर उत्तर देणारे अधिकारी काय सांगताहेत हेच कळत नाही. तांत्रिक अडथळे देखील मोठ्या प्रमाणात येतात. यंदाची महासभा प्रत्यक्ष घेण्याची मागणी विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी केली होती. त्यानुसार सभागृहाची साफसफाईदेखील करण्यात आली. परंतु महापौरांनी ऑनलाइन सभाच घेण्याचा निर्णय घेतला.
आता मात्र कोरोनामुळे घालण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्यात येत असून जिल्हा परिषदेच्या सर्व सभा प्रत्यक्ष उपस्थितीने करण्याचे आदेश आहेत, मग महापालिकेला मात्र महासभा प्रत्यक्ष घेण्याचे आदेश का नाहीत, असा प्रश्न आहे. मात्र, प्रत्यक्ष कामकाजात येणाऱ्या अडचणी लक्षात घेता पुढील महिन्यापासून महासभा प्रत्यक्षात घेण्याचे नियोजन महापौरांनी केले आहे.
कोट..
ऑनलाइन महासभेत अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे पुढील महिन्यापासून प्रत्यक्ष महासभा घेतली जाईल. त्यात पन्नास नगरसेवकांना अनुमती असेल बाकी सर्व जण ऑनलाइन सहभागी होतील.
- सतीश कुलकर्णी, महापौर.
............
छायाचित्र आर फोटोवर २० महासभा