आता मोठे रस्ते, मैदाने स्वच्छ करण्यासाठी यांत्रिकी झाडू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:19 AM2020-12-30T04:19:08+5:302020-12-30T04:19:08+5:30
आयुक्त कैलास जाधव यांनी ही माहिती दिली. सध्या स्वच्छ शहर सर्वेक्षणाअंतर्गत नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात स्वच्छताविषयक दीर्घकालीन उपक्रम राबविण्यावर ...
आयुक्त कैलास जाधव यांनी ही माहिती दिली. सध्या स्वच्छ शहर सर्वेक्षणाअंतर्गत नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात स्वच्छताविषयक दीर्घकालीन उपक्रम राबविण्यावर भर दिला जात आहे. कचऱ्याची विल्हेवाट त्याच ठिकाणी लावावी, यासाठी गृहनिर्माण संस्था, तसेच व्यावसायिक आणि औद्योगिक आस्थापनांना प्रोत्साहित करण्यात येत असून, त्या अंतर्गतच सुमारे सत्तर ते ऐंशी ठिकाणी कचऱ्याची आहे त्याच ठिकाणी शास्त्रोक्त विल्हेवाट लवण्यास सुरुवातही झाली आहे. मुख्य प्रश्न प्रमुख रस्ते आणि मैदानासारख्या ठिकाणांचा आहे. अशा ठिकाणी यांत्रिकी झाडू वापरण्याचे शासनाचे मार्गदर्शक तत्त्व आहे. त्या आधारे आता मैदाने आणि मोठे रस्ते झाडण्यासाठी स्विपिंग मशीन म्हणजेच यांत्रिकी झाडूचा वापर करण्यात येणार आहे. विशेषत: महामार्ग आणि अत्यंत रहदारीचे चार पदरी व तत्सम मोठे रस्ते झाडण्यासाठी या यांत्रिकी झाडूंचा वापर केला जाणार आहे. नाशिक महापालिकेने त्यासाठी तयारी सुरू केली असून, आता काही कंपन्यांकडून माहिती घेतली जाणार आहे आणि त्यानंतरच अशा प्रकारचे झाडू खरेदी करण्यात येणार आहेत. यापूर्वी माजी नगरसेवक विक्रांत मते यांनी आपल्या प्रभागात अशा प्रकारे यांत्रिकी झाडू प्रयोगिक स्वरूपात वापरले होेते. त्यानंतर, त्यांची मागणी वाढली असली, तरी हा विषय मागे पडला होता. मात्र, आता महापालिकाच खरेदी करणार आहे.
इन्फो...
शहरात स्वच्छतेसाठी आग्रह धरणाऱ्या महापौर सतीश कुलकर्णी यांनी आरोग्य सभापती असल्यापासूनच अनेकदा शहरातील पन्नास टक्के रस्ते स्वच्छ केले जात नाहीत, असे अनेकदा विधान केले आहे. त्यातच राज्य सरकारकडून सफाई कामगारांची भरती करण्यासाठी परवानगी मिळत नसल्याने महापालिकेची अडचण वाढत असून, त्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारे यांत्रिकी झाडू खरेदी करण्याचे सूचना पत्र त्यांनी प्रशासनाला दिले हेाते.
छायाचित्र आर फोटोवर २९ स्वीपींग (संग्रहीत छायाचित्र)