आता सहाही विभागांत दफनभूमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2019 12:47 AM2019-01-26T00:47:11+5:302019-01-26T00:47:28+5:30

महापालिकेच्या वतीने सहा विभागांत ख्रिश्चन, मुस्लीम, लिंगायत आणि महानुभव पंथियांसह अन्य समाजासाठी स्मशानभूमीसाठी जागा निश्चित करण्यात येणार आहे. त्यातील पूर्व विभागातील जागा निश्चित झाली आहे, अशी माहिती शुक्रवारी (दि.२५) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत देण्यात आली.

 Now the cemetery in six divisions | आता सहाही विभागांत दफनभूमी

आता सहाही विभागांत दफनभूमी

googlenewsNext

नाशिक : महापालिकेच्या वतीने सहा विभागांत ख्रिश्चन, मुस्लीम, लिंगायत आणि महानुभव पंथियांसह अन्य समाजासाठी स्मशानभूमीसाठी जागा निश्चित करण्यात येणार आहे. त्यातील पूर्व विभागातील जागा निश्चित झाली आहे, अशी माहिती शुक्रवारी (दि.२५) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत देण्यात आली.
महापालिकेत शुक्रवारी (दि. २५) झालेल्या बैठकीत सर्व धर्मीयांकरिता मोफत अंत्यसंस्कार योजना राबविण्याचा प्रस्ताव होता. तो मंजूर करताना यासंदर्भात नाशिक शहरातील विविध धर्मीयांमध्ये दफनभूमीची गरज आहे, त्यासंदर्भातील आपल्या पत्रावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली.
याबाबत दिनकर पाटील यांनी विचारणा केल्यानंतर अतिरिक्त आयुक्त हरिभाऊ फडोळ यांनी सिडको विभागात पाथर्डी यथील कचरा डेपे, नाशिक पूर्व व पश्चिम विभागात सर्व्हे नंबर ४०६ व ४०७ येथील जागा,
शहरातील विविध भागांत वाहतूक बेटे सुशोभीकरण्यासाठी महापालिकेच्या वतीने प्रायोजकांना आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार २५ प्रस्ताव आले होते. त्यातील १८ ठिकाणी प्रायोजकांना वाहतूक बेट विकसित करण्यासाठी देण्यास स्थायी समितीने मान्यता दिली.

Web Title:  Now the cemetery in six divisions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.