आता अपंगांचेही प्रमाणपत्र पडताळणार सीईओ बनकरांचा इशारा; बनावट प्रमाणपत्र सादर करणारे येणार गोत्यात
By admin | Published: December 7, 2014 01:40 AM2014-12-07T01:40:47+5:302014-12-07T01:42:09+5:30
आता अपंगांचेही प्रमाणपत्र पडताळणार सीईओ बनकरांचा इशारा; बनावट प्रमाणपत्र सादर करणारे येणार गोत्यात
नाशिक : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात बनावट पदवीचे प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळविणाऱ्या शिक्षकांवर फौजदारी कारवाई सुरू झाल्यानंतर अपंग प्रमात्रपणांच्या आधारे बदल्या टाळणाऱ्या व पदोन्नती घेणाऱ्या शिक्षक व कर्मचाऱ्यांवर आता संक्रांत येणार आहे. अपंग असल्याचे प्रमात्रपत्र सादर करणाऱ्या सर्वच अपंग शिक्षक व कर्मचाऱ्यांचे प्रमात्रपत्र मुंबई येथील सरकारी रुग्णालयातून तपासणी करण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी घेतला आहे. जिल्हा परिषदेत काही शिक्षक व कर्मचाऱ्यांनी बदली टाळण्यासाठी अशी अपंगांची बनावट प्रमाणपत्रे सादर केल्याची चर्चा असून, अशा कर्मचाऱ्यांचे आता सुखदेव बनकर यांच्या निर्णयामुळे धाबे दणाणले आहे. येवल्यातील एका शिक्षकाने पदवीचे बनावट प्रमाणपत्र सादर करून जिल्हा परिषदेच्या सेवेत नोकरी मिळविल्याचे उघड झाल्यानंतर त्याच्यावर फौजदारी कारवाई करण्यात आली. अशा बनावट प्रमाणपत्र सादर करणाऱ्या शिक्षकांचा शोध घेण्याचे आदेश यापूर्वीच सुखदेव बनकर यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी रहीम मोगल यांना दिले आहेत. आता अपंग असल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करून बदल्यांची कार्यवाही टाळली असेल आणि काहींनी अपंग प्रमाणपत्रांच्या आधारे पदोन्नती स्वीकारली असेल तर आता हे शिक्षक व कर्मचारी अडचणीत येण्याची चिन्हे आहेत. अपंगांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी मुंबई येथील सरकारी रुग्णालयातून करण्यात येईल. तसेच काही प्रकरणात बनावट अपंगत्व आढळल्यास अशा शिक्षक व कर्मचाऱ्यांवरदेखील पडताळणीनंतर दोषी आढळल्यास फौजदारी कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सुखदेव बनकर यांनी दिली. पाणीटंचाईसंदर्भात सुखदेव बनकर यांनी जिल्'ातील सर्व गटविकास अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्याकडून आढावा घेतला. त्यात काही अधिकाऱ्यांनी जलस्त्रोताची माहितीच सादर न केल्याने बनकर यांनी त्याबाबत नाराजी व्यक्त केली.(प्रतिनिधी)