....आता न्यायालये चालणार केवळ अडीच तास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:14 AM2021-04-20T04:14:43+5:302021-04-20T04:14:43+5:30
_____ नाशिक : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयाने नवे आदेश पारीत केले आहेत. या आदेशानुसार आता ...
_____
नाशिक : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयाने नवे आदेश पारीत केले आहेत. या आदेशानुसार आता जिल्हा व सत्र न्यायालयासह नाशिक जिल्ह्यातील अन्य न्यायालययांमध्ये एकाच सत्रात केवळ अडीच तासांकरिता न्यायालयीन कामकाज चालणार असल्याचे परिपत्रक प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश अभय वाघवसे असे यांनी शनिवारी (दि.१७) काढले
कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व न्यायालयांना येत्या १८ एप्रिलपर्यंत सुटी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे गेल्या मंगळवारपासून सोमवारपर्यंत (दि. १९) न्यायालयीन कामकाज बंद आहे. गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीची शासकीय सुटी असल्याने न्यायालयीन कामकाज बंद होते. तसेच उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार यांच्या आदेशानुसार
दोन दिवसांची सुटी जाहीर करत हा आठवडा सुटीचा पूर्ण केला. यामागील महत्वाचा उद्देश म्हणजे न्यायालयाच्या आवारात होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण मिळवून कोरोनाची साखळी तुटण्यास मदत होईल.
दरम्यान, शनिवारी पुन्हा उच्च न्यायालयाकडून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नवे आदेश काढण्यात आले आहे. या आदेशानुसार वाघवसे यांनी परिपत्रक जाहीर करत न्यायालयामध्ये केवळ तातडीची फौजदारी, दिवाणी स्वरुपाचे खटले, पोलीस रिमांड, जामीन अर्ज यावर सुनावणी होणार आहे. दररोज दुपारी १२ ते अडीच वाजेपर्यंत न्यायालयीन कामकाजाची वेळ निश्चित करण्यात आली आहे. अन्य सर्व प्रकारच्या खटल्याचे न्यायालयीन कामकाज हे पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहे. तसेच न्यायालयाच्या आवारातील वकील चेंबर, बार रुम, कॅन्टीन आदी सर्व पूर्णपणे बंद राहणार आहेत. त्याचप्रमाणे न्यायालयाच्या आवारात वकील, पक्षकार यांची संख्या मर्यादित ठेवण्याचे परिपत्रकात म्हटले आहे. तसेच न्यायालयीन कर्मचारी वर्गही रोटेशन पद्धतीने ठेवण्यात येणार आहे. सर्व न्यायालये प्रत्येक शनिवारी पूर्णपणे बंद राहणार असल्याचे परिपत्रकात म्हटले आहे. राज्य व केंद्र सरकारने घालून दिलेल्या कोरोनाशी संबंधित सर्व प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे न्यायालयाच्या परिसरात बंधनकारक राहणार आहे.