यंदा नवरात्र, गणेशोत्सवात प्रत्येकी चार दिवस वाद्य वाजविण्यास मुभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 07:39 PM2018-01-01T19:39:49+5:302018-01-01T19:42:33+5:30

सर्वोच्च न्यायालयाने ध्वनी प्रदुषण टाळण्यासाठी रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत सर्व प्रकारचे वाद्य, ध्वनीक्षेपक खुल्या जागेत वाजविण्यास बंदी घातलेली असून, बहुविध प्रांत व समाज असलेल्या देशात धार्मिक सण, उत्सवाच्या काळात ही अट केंद्र सरकारने शिथील केली

Now, every four days of Navratri, Ganesh Festival can play musical instruments | यंदा नवरात्र, गणेशोत्सवात प्रत्येकी चार दिवस वाद्य वाजविण्यास मुभा

यंदा नवरात्र, गणेशोत्सवात प्रत्येकी चार दिवस वाद्य वाजविण्यास मुभा

Next
ठळक मुद्देपंधरा दिवस शिथील : रात्री बारावाजेपर्यंत ध्वनीक्षेपकाचा दणाटा

नाशिक : केंद्र सरकारने राज्य सरकारला वर्षातून पंधरा दिवस ध्वनीक्षेपक व वाद्य वाजविण्यास रात्री बारा वाजेपर्यंत मुभा देण्याचे अधिकार दिल्याने त्या अनुषंगाने सरकारच्या आदेशाने सन २०१८ मध्ये सण, उत्सवासाठी रात्री बारा वाजेपर्यंत वाद्य वाजविण्याचे दिवस जिल्हा प्रशासनाने पोलीसांच्या अहवालानुसार निश्चित केले आहेत. नवरात्र व गणेशोत्सवासाठी प्रत्येकी चार दिवस यंदा देण्यात येणार असून, हे अगोदरच जाहीर झाल्यामुळे सार्वजनिक मंडळांची मोठी अडचण दूर झाली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने ध्वनी प्रदुषण टाळण्यासाठी रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत सर्व प्रकारचे वाद्य, ध्वनीक्षेपक खुल्या जागेत वाजविण्यास बंदी घातलेली असून, बहुविध प्रांत व समाज असलेल्या देशात धार्मिक सण, उत्सवाच्या काळात ही अट केंद्र सरकारने शिथील केली असली तरी, प्रत्येक राज्याचे महत्वाचे सण, उत्सवात फरक असल्याने अट शिथील करण्याबाबतचे दिवस निश्चित करण्यात केंद्र सरकारची मोठी अ डचण निर्माण झाली होती, त्यावर उपाय म्हणून गेल्या वर्षापासून केंद्र सरकारने राज्य सरकारांनाच पंधरा दिवस ठरविण्याचे अधिकार दिले आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात राज्य सरकारने प्रत्येक जिल्हाधिकाºयांना पत्र पाठवून पंधरा दिवस ध्वनीक्षेपक वाजविण्यास मुभा देणारे दिवस ठरविण्याचे अधिकार दिले होते. ऐनवेळी शासनाचे आदेश आल्याने त्याची अंमलबजावणी करण्यात प्रशासनाची धावपळ उडाली होती, परिणामी शासनाची मुभा असतानाही त्याचा लाभ सार्वजनिक मित्र मंडळांना घेता आला नाही. त्यामुळे सन २०१८ मध्ये जानेवारीच्या पहिल्याच दिवशी जिल्हाधिकाºयांनी दिवस निश्चित केले आहेत. या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत वाद्य वाजविण्यास मुभा असणार आहे.

Web Title: Now, every four days of Navratri, Ganesh Festival can play musical instruments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.