सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी आता पाच रुपये आकारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2022 01:01 AM2022-02-24T01:01:32+5:302022-02-24T01:01:52+5:30

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी खासगी वाहनातून येणाऱ्या भाविकांवर यापुढे सुधारित दरडोई दोन रुपयांऐवजी पाच रुपये कर आकारला जाणार असल्याचा निर्णय ग्रामपंचायतीतर्फे घेण्यात आला आहे.

Now five rupees is charged for darshan of Saptashrungi Devi | सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी आता पाच रुपये आकारणी

सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी आता पाच रुपये आकारणी

googlenewsNext
ठळक मुद्देग्रामपंचायतीचा निर्णय : खासगी वाहनातून येणाऱ्या भाविकांना लागणार दरडोई कर पाच रुपये

सप्तशृंगगड : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी खासगी वाहनातून येणाऱ्या भाविकांवर यापुढे सुधारित दरडोई दोन रुपयांऐवजी पाच रुपये कर आकारला जाणार असल्याचा निर्णय ग्रामपंचायतीतर्फे घेण्यात आला आहे.

गडावर येणाऱ्या भाविकांना नागरी सुविधा पुरविताना ग्रामपंचायतीला आर्थिक मर्यादा येत असून, उत्पन्नाचा स्रोत म्हणून भाविकांच्या वाहनांवर व भाविकांवर कर आकारण्याची मुभा मिळावी, अशी चर्चा जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत झाली होती. याविषयी सप्तशृंगगड ग्रामपंचायतीने जिल्हा परिषदेकडे पत्रव्यवहार केला होता. त्यामुळे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना प्रवेश कर दरडोई पाच रुपये कर आकारणी मंजुरी दिली आहे. त्यानुसार व ग्रामपंचायतीने केलेल्या कार्यवाहीनुसार कर आकारणीबाबत अंमलबजावणी करण्याचे आदेश सप्तशृंगगड ग्रामपंचायतीला देण्यात आले आहेत.

--------------------------------

वार्षिक उत्पन्न तुटपुंजे

गडावर भगवतीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना ग्रामपंचायतीकडून नागरी मूलभूत सोयीसुविधा देताना वार्षिक उत्पन्न तुटपुंजे असल्याने अडचणी येतात. शासनाकडून मिळणारा निधी अत्यल्प आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीकडून भाविकांना नागरी सोयीसुविधा देताना अल्प उत्पन्न आणि कमी उत्पन्न यामुळे सप्तशृंगगड ग्रामपंचायतीची आर्थिक ओढाताण होत असल्याने भाविकांकडून दरडोई पाच रुपये घेण्याचे ठरवले आहे. विशेष म्हणजे सदरचा कर हा खासगी वाहनातून येणाऱ्या वाहनातील प्रत्येक प्रौढ यात्रेकरू यांच्याकडून दरडोई पाच रुपये आकारण्यात येणार आहे. कर दिल्यानंतर प्रत्येक यात्रेकरूस पावती देणे बंधनकारक राहणार आहे. सार्वजनिक वाहन, एसटी बस, शासकीय वाहनातील प्रवासी, तसेच अपंग व लहान मुले या करातून वगळण्यात येणार आहेत.

             -------------------

सप्तशृंगगडावर दररोज हजारो भाविक दर्शनासाठी व पर्यटन स्थळ म्हणून येथे येत असतात. सुटीच्या काळात हीच गर्दी वाढत असते. त्यामुळे दरडोईचा कर हा नक्कीच सोयीसुविधा पुरविण्यासाठी फायद्याचा ठरणार आहे.

-रमेश पवार, सरपंच, सप्तशृंगगड

------------------

 

Web Title: Now five rupees is charged for darshan of Saptashrungi Devi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.