आता गंगापूररोड लोकसंकल्पनेतून सुशोभित करणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 03:38 PM2020-12-03T15:38:56+5:302020-12-03T15:43:27+5:30
नाशिक- रस्ते कसे असावे, ते पादचारी स्नेही कसे असावे, कोणत्या पध्दतीने सुशोभीत करावे यासाठी आता स्मार्ट सिटी कंपनीने लोकसहभाग वाढवणारा उपक्रम राबवण्यास सुरूवात आहे. त्यासाठी अशोकस्तंभ ते मॅरेथॉन चौक आणि तेथून केकाण रूग्णालयापर्यंतचा रस्ता निवडला आहे. नागरीकांनी त्यात सहभाग ध्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

रस्ते गरज म्हणून तयार होत असले तरी केवळ साधे रस्ते तयार करण्यापेक्षा त्यात वेगवेगळ्या सुविधा असल्या आणि ते सजविले गेले तर आनंददायी प्रवासहेाता. त्यामुळे केंद्र शासनाच्या स्ट्रीट फॉर पीपल चॅलेंज अंतर्गत आता लोकसहभाग वाढवण्याची संकल्पना पुढे आली आहे. या उपक्रमात सामान्य नागरीक,आकिटेक्ट, नगररचनाकार असे कोणीही पुढे येऊन संकल्पना राबवू शकेल. स्मार्ट सिटी मिशनच्या माध्यमातून हा उपक्रम राबवताना चाचपणी, शिक्षण आणि मुल्यमापन हे महत्वाचे सूत्र रस्ते सौंदर्यीकरणात वापरण्यात येणार आहे. कमीत कमी खर्चाबरोबरच कमीत कमी वेळेत रस्ते कशाप्रकारे सुंदर होऊ शकतात, चालण्यायोग्य हेाऊ शकतात या बाबी त्यासाठी महत्वाच्या ठरतात. रस्त्यावरील जागेचा सुयोग्य वापर, सुरक्षा, जीवनमान आणि पर्यावरणीय गोष्टींचा विचार करून कल्पना मांडणे महत्वाचे आहे.
स्मार्ट सिटीने या उपक्रमासाठी पायलट स्मार्ट रोड, मॅरेथॉन चौक ते केकाण हॉस्पीटल असा मार्ग निवडला आहे. या रस्त्याचे सुशोभिकरण, हिरवळ आणि लहान मुलांना खेळण्यासाठी तसेच लहान मुलांना खेळण्यासाठी व वृध्दांना बसण्यासाठी काय सुविधा देता येतील या स्वरूपाच्या संकल्पना मांडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्या अंतर्गत कंपनीशी संपर्क साधून त्यांनी दिलेल्या लिंकवर आपल्या संकल्पना मांडाव्या असे आवाहन कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांनी केली आहे.