आता फेरीवाल्यांचेही व्यवहार होणार ‘कॅशलेस’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 01:13 AM2021-01-25T01:13:23+5:302021-01-25T01:14:33+5:30
शहरातील नोंदणीकृत फेरीवाले आणि पथ विक्रेत्यांच्या उन्नतीसाठी केंद्र शासनाच्या वतीने पीएम स्वनिधी योजना सुरू करण्यात आली असून, त्याअंतर्गत नाशिक शहरातील ५ हजार २४२ नगरसेवकांना निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या विक्रेत्यांना डिजिटल म्हणजे कॅशलेस व्यवहार करण्याचे खास प्रशिक्षण मनपा आणि बँकेने दिले असून, आता रस्त्यावरील फेरीवाल्यांचे व्यवहारदेखील कॅशलेस हेाणार आहेत.
नाशिक : शहरातील नोंदणीकृत फेरीवाले आणि पथ विक्रेत्यांच्या उन्नतीसाठी केंद्र शासनाच्या वतीने पीएम स्वनिधी योजना सुरू करण्यात आली असून, त्याअंतर्गत नाशिक शहरातील ५ हजार २४२ नगरसेवकांना निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या विक्रेत्यांना डिजिटल म्हणजे कॅशलेस व्यवहार करण्याचे खास प्रशिक्षण मनपा आणि बँकेने दिले असून, आता रस्त्यावरील फेरीवाल्यांचे व्यवहारदेखील कॅशलेस हेाणार आहेत.
नोटाबंदीनंतर डिजिटल व्यवहार वाढल असून, तो अधिकृत मार्गाने हेात आहे. त्याचबरोबर व्यवहारात सुलभतादेखील आहे. केंद्र शासनाने गेल्याच वर्षी पीएम स्वनिधी ही योजना गेल्या वर्षी सुरू केली. यात ६ हजार ९०१ फेरीवाल्यांना स्वनिधी पुरवण्याचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ५ हजार २४३ जणांना बँकेमार्फत निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. आता केंद्र शासनाच्या सूचनेनुसार या विक्रेत्यांना डिजिटल व्यवहारांची माहिती देण्यासाठी मै भी डिजिटल हा कार्यक्रम घेण्यात आला. पंचवटीत बँक ऑफ महाराष्ट्र वतीने घेण्यात आलेल्या प्रशिक्षण शिबिराप्रसंगी मनपाच्या उपआयुक्त करुणा डहाळे, बँकेचे क्षेत्रीय प्रबंधक, महाप्रबंधक एन. एस. देशपांडे, संदीप पोटे, तसेच कर्ज वितरित झालेले पथविक्रेते लाभार्थी उपस्थित होते.
मनपाच्या उपआयुक्त करुणा डहाळे यांनी स्वनिधीसे समृद्धी या योजनेबाबत माहिती दिली व शासनाच्या विविध आठ योजनेचा लाभ कर्ज मिळालेल्या सर्व पथविक्रेत्यांनी मनपा विभागीय कार्यालय येथे ऑनलाईन फॉर्म भरावेत व मिळालेल्या कर्जाचे हप्ते वेळेत भरून सात टक्के व्याजाचा व डिजिटल व्यवहार करून मासिक कॅशबँकचा लाभ सर्व पथविक्रेत्यांनी घ्यावा, असे आवाहन केले.