आता नववी, दहावीतच मिळणार दाखले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 12:30 AM2019-06-22T00:30:21+5:302019-06-22T00:30:44+5:30
दहावीच्या निकालानंतर शैक्षणिक प्रवेशासाठी लागणारे दाखले काढण्यासाठी होणारी गर्दी आणि त्यातून निर्माण होणारा गोंधळ यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रवेशाच्या तारखेपर्यंतही दाखले मिळत नाही. सर्व्हर डाउन झाल्यामुळे तर संपूर्ण यंत्रणाच ठप्प होऊन जाते.
नाशिक : दहावीच्या निकालानंतर शैक्षणिक प्रवेशासाठी लागणारे दाखले काढण्यासाठी होणारी गर्दी आणि त्यातून निर्माण होणारा गोंधळ यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रवेशाच्या तारखेपर्यंतही दाखले मिळत नाही. सर्व्हर डाउन झाल्यामुळे तर संपूर्ण यंत्रणाच ठप्प होऊन जाते. यंदाही हा प्रश्न प्रकर्षाने समोर आल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी या कामात गतीमानता आणण्यासाठी पुढील शैक्षणिक वर्षापासून शाळांमधूनच विद्यार्थांना दाखले वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, सध्या अडकलेल्या हजारो दाखल्यांचा प्रश्न मार्गी लावण्याबाबतचे नियोजनदेखील जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.
दहावीच्या निकालानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी लागणाºया दाखल्यांसाठी शहरातील सेतू केंद्रांवर मोठी गर्दी होते. हजारोंच्या संख्येने या केंद्रांच्या माध्यमातून दाखले देण्याची प्रक्रिया राबविली जाते. यंदादेखील मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले मात्र सर्व्हर यंत्रणा कोलमडून पडल्यामुळे सुमारे सहा हजार दाखले अडकून पडले आहेत. त्यामुळे अर्ज स्वीकृती आणि दाखले वितरणाची संपूर्ण यंत्रणाच ठप्प पडली होती. अजूनही या यंत्रणेला गती प्राप्त होऊ शकलेली नाही. दाखले अडकून पडल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रारींचा पाऊस पडल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सेतू समितीची बैठक घेऊन त्यांना सूचना केल्या आहेत. शैक्षणिक दाखल्यासंदर्भात अशाप्रकारे सर्व्हर डाउन होण्याचे प्रकार नेहमीचेच झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण होतो.
दाखल्यांसाठी केलेल्या अर्जाची छायाप्रत व्हॉट्सअॅप नंबर, त्यासोबत स्वत:चा जुजबी माहिती, त्या आधारे व्हॉट्सअॅपद्वारे सदर अर्ज संबंधित शाखेकडे फॉरवर्ड केला जाणार आहे. संबंधित शाखा प्रमुखांनी अशा अर्जावर तीन दिवसांत काम करून उत्तर देणे बंधनकारक असेल. याबाबत समाधानकारक उत्तर न मिळाल्यास पुन्हा व्हॉट्सअॅपवर ही तक्र ार निदर्शनास आणून दिली जाईल. मात्र, तरीदेखील विलंब झाल्यास संबंधित कर्मचाºयांवर कारवाई केली जाईल.
इयत्ता दहावी व बारावीचे निकाल लागल्यानंतर सेतूमध्ये शैक्षणिकदाखले घेण्यासाठी पालकांची गर्दी होते; मात्र महाआॅनलाइनचे सर्व्हर डाउनमुळे हजारो दाखले प्रलंबित आहेत. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांना जीव टांगणीला लागतो. दरवर्षी जून-जुलैमध्ये दाखल्यांसाठी होणारी गर्दी व कोलमडणारे नियोजन टाळण्यासाठी पुढील वर्षी जुलैपासूनच शाळांमध्ये वेगवेगळे दाखले नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रदान करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी घेतला.
तक्रार नोंदविण्यासाठी व्हॉट्सअॅप नंबर
दरवर्षी वेळेत शैक्षणिक दाखले प्रदान करण्यात करण्याच्या प्रक्रियेत गोंधळाची परिस्थिती निर्माण होत असल्याने यापुढे इयत्ता नववी व दहावीत असतानाच विद्यार्थ्यांना शाळेत दाखले प्रदान केले जातील. पुढील वर्षापासून या निर्णयची अंमलबजावणी केली जाईल, असा निर्णय जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी घेतला आहे. तसेच, सद्य:स्थितीत दाखले वितरणाचे प्रलबिंत प्रकरणे लक्षात घेता विशेष कक्ष स्थापन करून अर्जदारांना तक्र ार नोंदविण्यासाठी व्हॉट्सअॅप नंबर उपलब्ध करून दिला जाणार असल्याचेही मांढरे यांनी सांगितले.