आता पीक विम्याबाबत समस्या मांडता येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:18 AM2021-08-20T04:18:42+5:302021-08-20T04:18:42+5:30

पेठ : आपल्या पिकावर आलेल्या नैसर्गिक संकटातून वाचविण्यासाठी व झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी शेतकरी दरवर्षी पीक विमा काढत ...

Now it is possible to raise the issue of crop insurance | आता पीक विम्याबाबत समस्या मांडता येणार

आता पीक विम्याबाबत समस्या मांडता येणार

Next

पेठ : आपल्या पिकावर आलेल्या नैसर्गिक संकटातून वाचविण्यासाठी व झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी शेतकरी दरवर्षी पीक विमा काढत असतात मात्र याबाबत कोणाकडे दाद मागावी, असा प्रश्न निर्माण होत असल्याने कृषी विभागाच्या आदेशानुसार आता तालुकास्तरावर कंपनीकडून मदत कक्ष उभारण्यात आल्याने आता शेतकऱ्यांना आपल्या समस्या सोडवून घेता येणार आहेत.

पेठ येथे भारती ॲक्सा पीक विमा कक्षाचे उद्घाटन तालुका कृषी अधिकारी अरविंद पगारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंडळ कृषी अधिकारी श्रीरंग वाघ, मुकेश महाजन, किरण कडलग, विमा प्रतिनिधी राजेंद्र दळवी आदी उपस्थित होते. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी समजावून घेऊन त्या सोडवणे, शेतकऱ्यांना पीक विमा योजनेत सहभागी करून मागदर्शन करणे व तालुका स्तरावरील समितीसमोर कमीत कमी तक्रारी येतील याची दक्षता घेणे हा या मागचा उद्देश आहे.

फोटो

- १९ पेठ इन्शुरन्स

पेठ येथे पीक विमा मदत कक्षाचा शुभारंभप्रसंगी तालुका कृषी अधिकारी अरविंद पगारे, श्रीरंग वाघ, मुकेश महाजन, राजेंद्र दळवी आदी.

190821\19nsk_33_19082021_13.jpg

पेठ येथे पिक विमा मदत कक्षाचा शुभारंभ प्रसंगी तालुका कृषी अधिकारी अरविंद पगारे, श्रीरंग वाघ, मुकेश महाजन, राजेंद्र दळवी आदी.

Web Title: Now it is possible to raise the issue of crop insurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.