आता महाबळ चौकाचे नामांतर करण्याचा घाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:13 AM2021-01-17T04:13:30+5:302021-01-17T04:13:30+5:30
सध्या शहरात महापालिकेच्या निवडणुकीचे वारे आहे. त्यामुळे स्थानिक मतदारांना खुश करण्यासाठी त्यांची आस्था असलेले किंवा अन्य कोणत्याही मान्यवरांपासून स्थानिक ...
सध्या शहरात महापालिकेच्या निवडणुकीचे वारे आहे. त्यामुळे स्थानिक मतदारांना खुश करण्यासाठी त्यांची आस्था असलेले किंवा अन्य कोणत्याही मान्यवरांपासून स्थानिक जागा मालकाचेदेखील नाव देण्याचे प्रस्ताव महासभेत सादर करण्यात येत आहेत. आता येत्या मंगळवारी (दि.१९) हेाणाऱ्या महासभेतही अशाच प्रकारे नामकरणाचे प्रस्ताव आहे. त्यात विषय क्रमांक ४७२ नुसार एमजी रोडवरील सिग्नल चौकाचे नामकरण करण्याचे प्रस्ताव असे नामकरण करण्याचा प्रस्ताव आहे. मुळातच या चौकाचे अगोदरच नामकरण झाले आहे. १९८२ मध्ये म्हणजेच महापालिका स्थापन झाल्यानंतर प्रशासकीय राजवटीत या चौकाला महाबळ चौक असे नाव देण्यात आले आहे. तत्कालीन संस्थेचे आश्रयदाते डॉ. दादासाहेब केळकर यांनी हे नामकरण केले असून, त्याची सर्वत्र नोंद आहे. आजही संस्थेच्या कुंपणावर तसे नामकरण केल्याची नोंद आहे. मात्र, यानंतरही ही या प्रभागाच्या विद्यमान नगरसेवकाने अन्य नाव देण्याचा प्रस्ताव मांडला आहे.
इन्फो..
गुरुजींचे कार्य
कृ. ब. महाबळ गुरुजी यांचे नाशिकच्या विकासात मोठे योगदान असून, त्यांचा व्यायामाचार्य किंवा व्यायाममहर्षी म्हणून त्यांची ओळख होती. महाबळ गुरुजींनी पारतंत्र्यातून भारताला मुक्त करण्यासाठी बलवान, निरोगी, स्वाभिमानी, पिढी घडविण्यासाठी १ मार्च १९१७ रोजी गोदाकाठी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज संस्थानच्या जागेत श्री यशवंत व्यायामशाळेची स्थापना केली. २५ ऑगस्ट १९३९ आलेल्या महापुरात ही व्यायामशाळा वाहून गेली.
अभिनव भारतचे शपथबद्ध कार्यकर्ते असलेल्या गुरुजींना जॅक्सन वधानंतर ब्रिटिशांच्या छळालादेखील सामोरे जावे लागले. त्यानंतर दुसऱ्या महायुद्धानंतर त्यांनी गेादावरीपासून सुरक्षित अंतरावर दोन एकर जागा मिळावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले. स्वातंत्र्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांनी ही जागा मिळवून दिली. त्यानंतर ही व्यायामशाळा उभी राहिली.
-------
छायाचित्र आर फोटोवर १६ महाबळ चौक व १६ नामकरण नावाने सेव्ह आहे.