आता मॅडम नव्हे ताई, माई म्हणणार मुले...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 12:08 AM2017-09-01T00:08:28+5:302017-09-01T00:08:34+5:30
लातूरच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी शाळेत ज्ञानदान करणाºया महिला शिक्षकांना मॅडम म्हणण्याऐवजी यापुढे ‘ताई किंवा माई’ या नावाने संबोधावे, असा अध्यादेश काढला असून, संपूर्ण महाराष्टÑात याची अंमलबजावणी होणार आहे.
नामपूर : लातूरच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी शाळेत ज्ञानदान करणाºया महिला शिक्षकांना मॅडम म्हणण्याऐवजी यापुढे ‘ताई किंवा माई’ या नावाने संबोधावे, असा अध्यादेश काढला असून, संपूर्ण महाराष्टÑात याची अंमलबजावणी होणार आहे.
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रात शिक्षणाची गुणवत्ता जोपासत असतानाच संस्कृती, नीतिमूल्यांची जोपासना करताना मोठ्यांप्रति आदरभाव जोपासण्याचा प्रयत्नही शिक्षण खाते करत असताना दिसत आहे. पूर्वी शाळेतील शिक्षकांना गुरुजी या नावाने संबोधत असत. आताच्या आधुनिक काळात सर किंवा टीचर, स्त्री शिक्षकास मॅडम या नावाने संबोधले जात आहे. ‘मॅडम’ हा शब्द तसा ब्रिटिशकालीनच...! मराठी शाळेतील विद्यार्थी त्यामुळे शिक्षकांना सर, मॅडम या नावाने आदराने हाक मारताना दिसतात. बºयाचशा इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मॅडम शब्दाचा शॉर्टकट म्हणून ‘मॅम’ म्हणून संबोधले जाते. अध्यापनासारख्या पवित्र व महत्त्वपूर्ण प्रक्रियेत अध्यापकाबाबत प्रेम व आदरभाव टिकून रहावा म्हणून ताई व माई हे शब्द वापरल्यास तो दूर होऊन अध्यापनाबाबत जिव्हाळा तयार होईल ही यामागची भूमिका आहे.
लातून जिल्हा परिषदेचा जीआर जा. क्र. जिपला/शिक्षण/ कावि/ २२०/२०१७ दिनांक २९/८/१७ अन्वये शिक्षिकांना मॅडमऐवजी ताई-माई संबोधावे असे प्रत्येक पंचायत समितीला कळविण्यात आले आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्टÑ कार्यक्रमांतर्गत प्रत्येक मूल शाळेत यावं, त्याने शिकावं हा शासनाचा हेतू आहे. शाळांनी यासाठी विशेष कार्ययोजना आखून त्याद्वारे मुले शाळाबाह्य न होता. ते शिक्षणाच्या प्रवाहात कसे टिकून राहतील यासाठी शासन प्रयत्न करीत असते. पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार प्रत्येक अध्यापक हा सुलक्षक म्हणून कार्यरत आहे. बºयाच वेळा शिक्षक व विद्यार्थी यांच्यामधील नातेसंबंधाचा परिणाम मुलांच्या शिकण्यावर होतो. याचाच विचार शासनाने करून प्रस्तावित प्रयोगाद्वारे शिक्षण, आनंददाई, दर्जेदार होण्याचा प्रयत्न होत आहे. नवीन शैक्षणिक धोरणात आता शिक्षक होण्यासाठी फक्त आता वशिला व शिक्षणच पुरेसे नसून शिक्षकांच्या अंगी गुणवत्ताही आवश्यक रहाणार आहे. शिक्षक गुणवत्ता चाचणी परीक्षेतही उत्तीर्ण झाला तरच तो शिक्षक होणार आहे.