...आता ‘मायक्रोव्हेव’ करणार बायोवेस्ट निर्जंतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 11:24 PM2020-02-08T23:24:21+5:302020-02-09T00:26:17+5:30
प्लॅस्टिक कचरा ही शहराची नव्हे, तर संपूर्ण देशाची मोठी गंभीर समस्या बनली आहे. वर्षानुवर्षे न कुजणारे प्लॅस्टिक जणू मनुष्याची जीवनशैली बनत चालला आहे. प्लॅस्टिकच्या जैविक कचऱ्यावर मात करण्यासाठी राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाने चक्क ‘मायक्रोव्हेव डिसइन्फेक्टर’ राज्यात प्रथमच नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात बसविला आहे.
नाशिक : प्लॅस्टिक कचरा ही शहराची नव्हे, तर संपूर्ण देशाची मोठी गंभीर समस्या बनली आहे. वर्षानुवर्षे न कुजणारे प्लॅस्टिक जणू मनुष्याची जीवनशैली बनत चालला आहे. प्लॅस्टिकच्या जैविक कचऱ्यावर मात करण्यासाठी राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाने चक्क ‘मायक्रोव्हेव डिसइन्फेक्टर’ राज्यात प्रथमच नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात बसविला आहे. यामुळे रुग्णालयात निघणाºया जैव वैद्यकीय प्लॅस्टिक कचºयाच्या समस्येवर सहज मात करून त्याचा पुनर्वापरही करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालयावर दिवसेंदिवस जिल्ह्यातील रुग्णांचा मोठा ताण वाढत आहे. त्यामुळे वैद्यकीय उपचारादरम्यान निघणारे प्लॅस्टिक जैव वैद्यकीय कचºयाची समस्याही गंभीर रूप धारण करत असताना जिल्हा रुग्णालय प्रशासनाला या कचºयाचे नेमके करायचे काय? असा प्रश्न पडत होता.
या आधुनिक यंत्राच्या सहाय्याने वरील सर्व प्लॅस्टिकचे वैद्यकीय साहित्य वापरानंतर या यंत्रात टाकून एका विशिष्ट तापमानापर्यंत तापविले जाणार आहे. त्यामुळे त्यामधील जिवाणू, विषाणू नष्ट होऊन त्याचा पुनर्वापर करण्यासाठी कारखान्याला पाठविता येतील. या माध्यमातून पर्यावरणाचे संरक्षण तर होण्यास मदत होईलच, मात्र शासनाला महसूलदेखील मिळेल, असा विश्वास जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी व्यक्त केला. या यंत्राचे अनावरण मंडळाचे सदस्य सचिव र्ई. रविंद्रन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रधान वैद्यकीय अधिकारी डॉ. अमर सुपाते, विभागीय अधिकारी डॉ. जे. बी. संगेवार आदी उपस्थित होते.
जिल्हा रुग्णालयाची यंत्रणाही होतेय ‘स्मार्ट’
रुग्णालयात वापरादरम्यान निघणाºया प्लॅस्टिकच्या सुईविरहित सिरिंज, सलाइन बाटल्या, नळ्या, कॅथेटर्स, आयव्ही सेट, हातमोजे, मूत्रपिशव्या, व्हॅक्युट्युनर्स यांसारख्या वस्तूंना पुन्हा वापरात आणण्याजोगे करण्याचे काम हे यंत्र करणार आहे. त्यामुळे प्लॅस्टिकचा जैववैद्यकीय कचरा आता कमी होण्यास मदत होईल. या इको-फ्रेण्डली यंत्रामुळे पर्यावरण संरक्षणालाही हातभार लागणार आहे. स्मार्ट सिटी होत असताना जिल्हा शासकीय रुग्णालयदेखील कात टाकत असून ‘स्मार्ट’ आरोग्यसेवा पुरविण्यास प्रयत्नशील असल्याचे जगदाळे म्हणाले.
दररोज १५ बादल्या कचरा
दररोज दहा ते पंधरा मोठ्या बादल्या भरून सिरिंज, सलाइन, कॅथेटर्स यांसारखा कचरा साचत होता. या कचºयाची विल्हेवाट लावताना प्रशासनाच्या नाकीनव येत होते. त्यामुळे राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या ही बाब निदर्शनास आणून देण्यात आली. महामंडळाने सुमारे एक कोटी रुपये खर्च करून जिल्हा शासकीय रुग्णालयाला ‘मायक्रोव्हेव डिसइन्फेक्टर’ भेट दिला आहे.