शालेय पोषण आहारात आता दूध भुकटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 01:15 AM2018-08-24T01:15:15+5:302018-08-24T01:15:28+5:30
पेठ : दुधाला भाव मिळत नाही यामुळे मागील महिन्यात राज्यात आंदोलन छेडण्यात आले होते. वाढीव भावाची शेतकऱ्यांची मागणी मान्य झाली असली तरी खरेदी केलेल्या दुधाचे करावे काय असा प्रश्न शासनासमोर होता. यावर उपाय म्हणून आता शासनाने खरेदी केलेल्या दुधाची पावडर तयार करून त्याचा शालेय पोषण आहारात पूरक आहार म्हणून वापर करण्यात येणार आहे.
तीन महिन्यांसाठी शासनाचा प्रायोगिक प्रकल्प
पेठ : दुधाला भाव मिळत नाही यामुळे मागील महिन्यात राज्यात आंदोलन छेडण्यात आले होते. वाढीव भावाची शेतकऱ्यांची मागणी मान्य झाली असली तरी खरेदी केलेल्या दुधाचे करावे काय असा प्रश्न शासनासमोर होता. यावर उपाय म्हणून आता शासनाने खरेदी केलेल्या दुधाची पावडर तयार करून त्याचा शालेय पोषण आहारात पूरक आहार म्हणून वापर करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने काढलेल्या शासन निर्णयात सध्या राज्यात उद्भवलेल्या अतिरिक्त दूध व दुधाच्या भुकटीवर उपाय म्हणून आगामी तीन महिन्यांसाठी राज्यातील शालेय पोषण आहार पात्र शाळांमधील इयत्ता १ ली ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना दूध भुकटीची पाकिटे पुरविण्यात येणार आहेत. एक महियासाठी प्रति विद्यार्थी २०० ग्रॅम प्रमाणे तीन महिन्यांसाठी तीन पाकिटे विद्यार्थ्यांच्या घरी देण्यात येणार आहेत. त्यापासून दूध तयार करण्याबाबतचे प्रशिक्षण शिक्षक व पालकांना देण्यात येणार आहे.
प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणाºया या योजनेच्या संनियत्रणासाठी राज्यस्तरावर वरिष्ठ अधिकाºयांची समिती स्थापन करण्यात आली आहे. शिक्षण संचालक (प्राथ.) पुणे हे या योजनेचे राज्य समन्वयक म्हणून कामकाज पाहणार आहेत.पालकांना प्रात्यक्षिक दाखविणारशाळेत दूध भुकटीची पाकिटे प्राप्त झाल्यानंतर शाळा प्रशासनाने शाळा व्यवस्थापन समिती व पालकांसमवेत दूध भुकटी वाटप दिवस साजरा करावयाचा आहे. याच दिवशी दूध भुकटीपासून दूध तयार करण्याचे प्रात्यक्षिक पालकांना देण्यात यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.