आता रामकुंडांमधील तळकाँक्रिटीकरण हटवण्याच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:19 AM2021-02-17T04:19:41+5:302021-02-17T04:19:41+5:30

रामकुंड परिसरात बारा पुरातन कुंड असून या कुंडांचे वेळोवेळी तळ कॉक्रिटीकरण केल्याने नदीखाली स्रोत दबले गेले आहेत. त्यामुळे तळ ...

Now the move to remove the bottom concretization in Ramkunda | आता रामकुंडांमधील तळकाँक्रिटीकरण हटवण्याच्या हालचाली

आता रामकुंडांमधील तळकाँक्रिटीकरण हटवण्याच्या हालचाली

Next

रामकुंड परिसरात बारा पुरातन कुंड असून या कुंडांचे वेळोवेळी तळ कॉक्रिटीकरण केल्याने नदीखाली स्रोत दबले गेले आहेत. त्यामुळे तळ काँक्रिटीकरण त्वरित हटवावे अशी मागणी जानी यांनी यापूर्वी केली होती. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. स्मार्ट सिटीच्या प्रोजेक्ट गोदा अंतर्गत नदीपात्रातील तळ काँक्रिटीकरण काढण्याचे ठरवले असले तरी त्यावरून बरेच वाद झाल्याने केवळ दुतोंड्य मारोती ते गाडगे महाराज पुलापर्यंतचे काँक्रिटीकरण हटवण्यात आले तर अन्यत्र जलस्रोत तपासण्यासाठी ट्रायल बोअर घेण्याचे ठरले होते. त्यानुसार ते घेण्यात आले आणि तेथे निरंतर पाणी निघत असल्याने आता रामकुंडासह श्री गोदावरी नदीपात्रातील उर्वरित १२ पुरातन कुंडांचे सिमेंट-कॉक्रिटीकरण काढण्याची मागणी याचिकाकर्ते देवांग जानी यांनी महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.

इन्फो..

रामकुंडाचे तळ कॉंक्रिटीकरण काढण्यावरून बरेच वादविवाद झाले आहेत. त्यामुळे आता स्मार्ट सिटी या विषयाला लगेचच हात घालण्यापेक्षा संचालक मंडळाच्या बैठकीतच निर्णय घेणार असल्याचे वृत्त आहे.

Web Title: Now the move to remove the bottom concretization in Ramkunda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.