आता ‘माझा महापौर’ अ‍ॅप,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2020 12:51 AM2020-01-05T00:51:01+5:302020-01-05T00:53:03+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी महापौर सतीश कुलकर्णी यांनी प्रशासकीय बैठका घेतल्यानंतर प्रत्यक्ष तक्रारींची दखल घेण्यासाठी मनपाच्या ई-कनेक्ट अ‍ॅपमध्येच माझा महापौर नावाचे फिचर सुरू केले आहे. त्यामुळे तक्रारींची दखल न घेणारे अधिकारी आता महापौरांच्या रडारवर असतील, तर दुसरीकडे पुढील आठवड्यापासून प्रभाग दौरे सुरू करणार आहेत.

Now the 'My Mayor' app, | आता ‘माझा महापौर’ अ‍ॅप,

आता ‘माझा महापौर’ अ‍ॅप,

Next
ठळक मुद्देदर शनिवारी प्रभाग दौरेनवे उपक्रम । सतीश कुलकर्णी यांची घोषणा

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी महापौर सतीश कुलकर्णी यांनी प्रशासकीय बैठका घेतल्यानंतर प्रत्यक्ष तक्रारींची दखल घेण्यासाठी मनपाच्या ई-कनेक्ट अ‍ॅपमध्येच माझा महापौर नावाचे फिचर सुरू केले आहे. त्यामुळे तक्रारींची दखल न घेणारे अधिकारी आता महापौरांच्या रडारवर असतील, तर दुसरीकडे पुढील आठवड्यापासून प्रभाग दौरे सुरू करणार आहेत.
महापौर सतीश कुलकर्णी यांनी शनिवारी (दि.४) आपल्या नवीन योजनांची घोषणा केली. यावेळी उपमहापौर भिकुबाई बागुल, स्थायी समिती सभापती उद्धव निमसे, सभागृह नेते सतीश सोनवणे आदी उपस्थित होते. गेल्या काही दिवसांत महापौरांनी सर्व खात्यांच्या बैठका घेऊन सामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यावर भर देण्याचे निर्देश दिले आहेत. यानंतरही तक्रारकर्त्या नागरिकांच्या समस्या सुटत नसतील तर त्यांनी आपल्यापर्यंत थेट पोहोचावे
पर्यटकांसाठी गर्दीच्या ठिकाणी माहिती केंद्रांची निर्मिती
नाशिक शहर हे धार्मिक व कुंभनगरी म्हणून प्रसिद्ध आहे. यामुळे नाशिकला भाविक व पर्यटक येत असतात. या पर्यटकांना शहर व जिल्ह्यातील विविध ठिकाणांची माहिती व्हावी यासाठी बसस्थानक, रेल्वेस्थानक अशा गर्दीच्या ठिकाणी मनपामार्फत माहिती केंद्रं सुरू करण्यात येतील, त्यासाठी विविध उद्योजकांच्या सीएसआर उपक्रमांची मदत घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Now the 'My Mayor' app,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.