फायर बॉल निविदेत आता नवा घोटाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:25 AM2021-03-04T04:25:42+5:302021-03-04T04:25:42+5:30
ही निविदाप्रक्रिया पूर्णत: रद्द करावी आणि संंबंधित कंपन्यांना पुन्हा निविदा भरता येणार नाही अशा पद्धतीने बाद ठरवावे अशी मागणी ...
ही निविदाप्रक्रिया पूर्णत: रद्द करावी आणि संंबंधित कंपन्यांना पुन्हा निविदा भरता येणार नाही अशा पद्धतीने बाद ठरवावे अशी मागणी बोरस्ते यांनी आयुक्तांकडे केली आहे.
महापालिकेने मागवलेल्या निविदांना प्रतिसाद देत एकूण सात कंपन्यांनी निविदा दाखल केल्या होत्या. त्यातील तीन निविदा तांत्रिक कारणामुळे नाकारण्यात आल्या, तर उर्वरित चार निविदांमध्ये एकाच वितरकाने निविदा भरून साखळी केल्याचे आढळले आहे. हा प्रकार गंभीर असून, निविदा प्रक्रियेतील स्पर्धेस छेद देणारी आहे. एकाच वितरकाच्या निविदा मंजूर करून इतरांना हेतुपुरस्सर डावलल्याचे सकृत दर्शनी आढळत आहे. त्यामुळे ही निविदाप्रक्रिया रद्द करावी आणि सखोल चौकशी करून फसवणूक करणाऱ्या वितरकाच्या सर्व निविदा बाद कराव्यात, अशी मागणी बाेरस्ते यांनी पत्रात केली आहे.
इन्फो..
महापालिकेने फायर बॉलसाठी निविदा मागवल्यानंतर त्यात अनेक प्रकारचा गोंधळ आढळला आहे. मुळात बाजारात अवघे सातशे ते आठशे रुपयांचे फायर बॉल खरेदी करताना महपालिकेने मात्र एका बॉलची किंमत ६ हजार ३०० रुपये दाखवली आहे. याशिवाय आयएसआय कोडची कोणतीही सक्ती नाही. त्यामुळे अनेक शंका यापूर्वीही उपस्थित झाल्या आहेत. आयुक्त कैलास जाधव यांनी याप्रकरणी दर तपासणीचे आदेश दिले होते.