आता मराठा क्रांती मोर्चाची नाशिकमध्ये बिगर राजकीय समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 01:16 AM2018-08-03T01:16:03+5:302018-08-03T01:16:47+5:30

नाशिक : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्यभरात पेटलेल्या आंदोलनाची दाहकता वाढत असताना मराठा क्रांती मोर्चाच्या नाशिकमधील आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी बिगर राजकीय समिती स्थापन करण्याचा निर्णय गुरुवारी (दि.२) झालेल्या जिल्हास्तरीय बैठकीत घेण्यात आला आहे.

Now the non-political committee of the Maratha Kranti Morcha in Nashik | आता मराठा क्रांती मोर्चाची नाशिकमध्ये बिगर राजकीय समिती

आता मराठा क्रांती मोर्चाची नाशिकमध्ये बिगर राजकीय समिती

Next
ठळक मुद्देसमन्वय बैठकीत निर्णय : राजकीय व्यक्तींनी पाठिंबा देण्याचा ठराव

नाशिक : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्यभरात पेटलेल्या आंदोलनाची दाहकता वाढत असताना मराठा क्रांती मोर्चाच्या नाशिकमधील आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी बिगर राजकीय समिती स्थापन करण्याचा निर्णय गुरुवारी (दि.२) झालेल्या जिल्हास्तरीय बैठकीत घेण्यात आला आहे. या समितीच्या माध्यमातून जिल्'ातील आंदोलनाला दिशा देण्यासोबतच राज्यभरातही अशाच प्रकारे नियोजन समिती स्थापन करून आंदोलनाला चेहरा देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, नाशिक मध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या दुसऱ्या टप्प्यात आतापर्यंत आंदोलन करणाºया काही आंदोलकांनी यापुढील आंदोलनाचे नेतृत्व भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल यांच्याकडे सोपविल्याने आंदोलनात दुहीचे बिजारोपण होण्याची लक्षणे दिसून आली आहेत.
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्यभरात ५७ मोर्चे निघाल्यानंतर मुंबईमध्ये ५८वा मराठा समाजाचा मूक क्रांती मोर्चा कोणत्याही चेहºयाशिवाय यशस्वी झाला. परंतु, नेतृत्वाशिवाय कोणताही लढा यशस्वी होऊ शकत नाही. त्यामुळे आता आरक्षणासंदर्भात सरकारशी चर्चा करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाला चेहरा प्राप्त करून देणे गरजेचे सांगत नाशिक जिल्'ात बिगर राजकीय व्यक्तींच्या नेतृत्वात समिती स्थापन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.
या समितीच्या माध्यमातून जिल्हाभरातील आंदोलनाचे नेतृत्व व नियोजन करण्यात येणार असून, या बिगर राजकीय नियोजन समितीच्या समन्वयकांमध्ये चंद्रकांत बनकर आणि अ‍ॅड. श्रीधर माने यांच्यासह आणखी काही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या व्यक्तींचा समावेश करण्यात येणार आहे. या समितीच्या पाठीमागे राजकीय व्यक्तींनीही सक्रिय राहण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी लढा सुरू ठेवण्यासोबत राजकीय लढा देण्यासाठी संपूर्ण ताकद लावण्यासाठी समाजाने एकत्रित लढण्याची गरज व्यक्त करतानाच प्रसंगी उच्च न्यायालयात समाजाची बाजू मांडण्यासाठी मराठा समाजाच्याच तज्ज्ञ वकिलाची नेमणूक करण्याचा विचारही या बैठकीत पुढे आला.
दरम्यान, आंदोलनाची धग कायम ठेवतानाच तालुकास्तरीय आंदोलनाचे नियोजन व समन्वय साधण्यासाठी तालुकास्तरीय समिती नेमण्याचा विचार समाजातील काही नेत्यांनी मांडला.
या बैठकीप्रसंगी आधारतीर्थ आश्रमातील आत्महत्या केलेल्या शेतकºयांच्या मुलांनीही सहभाग घेत हातात फलक घेऊन मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची मागणी केली. सर्वपक्षीय नेत्यांची मांदियाळीनाशिक जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनापासून समाजातील राजकीय नेते दूर असल्याची चर्चा होत असताना गुरुवारी झालेल्या बैठकीत समाजातील बव्हंशी राजकीय नेत्यांनी हजेरी लावली. यात नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार, माजी आमदार माणिकराव कोकाटे, शिरीष कोतवाल, अपूर्व हिरे, नितीन भोसले,तसेच सुनील बागुल, विजय करंजकर, निरंजन ठाकरे, शरद कोशिरे, माजी महापौर दशरथ पाटील, प्रकाश मते, नगरसेवक संभाजी मोरुस्कर, शाहू खैरे, विलास शिंदे, शिवाजी सहाणे, करण गायकर, तुषार जगताप, गणेश कदम, निवृत्ती अरिंगळे, अमृता पवार, डॉ. सुनील ढिकले, नाना महाले, सचिन पिंगळे, अनिल भालेराव, हर्षदा गायकर, माधवी पाटील, पूजा धुमाळ, अस्मिता देशमाने, गोकुळ पिंगळे, केशव पाटील, विष्णुपंत म्हैसधुणे, आशिष हिरे, सचिन मराठे, महेश बिडवे, शरद देवरे, डॉ. संदीप कोतवाल आदीनी सहभागी होत जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार करण्यात आला.आंदोलनात दुहीची लक्षणे
मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनातील दुसºया टप्प्यातील मोर्चात आतापर्यत ठोक मोर्चा व आमदारांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करणारे कार्यकर्ते व त्यांच्या समर्थकांनी यापुढील आंदोलनाचे नेतृत्व नाशिकच्या शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष सुनील बागुल यांच्याकडे सोपविण्याचा निर्णय जाहीर केला. तत्पूर्वी जिल्हास्तरीय बैठकीत यातील काही महिलांनी आतापर्यंच्या आंदोलनात पोलिसांनी महिलांना ताब्यात घेतले असताना समाजाचे नेते कोठे होते, असा सवालही उपस्थित केला होता.

Web Title: Now the non-political committee of the Maratha Kranti Morcha in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.