आता कालिकादेवीचे आॅनलाइन दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 12:27 AM2017-09-08T00:27:04+5:302017-09-08T00:27:13+5:30
शहराची ग्रामदेवता कालिकादेवी मंदिर ट्रस्टच्या वतीने यंदा आॅनलाइन दर्शन सुरू करण्यात येणार आहे. शिर्डीसह अन्य धार्मिक स्थळांच्या धर्तीवर ही सुविधा असली तरी सशुल्क सेवा असणार आहे. याशिवाय नवरात्राच्या पार्श्वभूमीवर नूतन भक्तनिवासाचे काम पूर्ण झाल्याने तेही भाविकांसाठी खुले करून देण्यात येणार आहे.
नाशिक : शहराची ग्रामदेवता कालिकादेवी मंदिर ट्रस्टच्या वतीने यंदा आॅनलाइन दर्शन सुरू करण्यात येणार आहे. शिर्डीसह अन्य धार्मिक स्थळांच्या धर्तीवर ही सुविधा असली तरी सशुल्क सेवा असणार आहे. याशिवाय नवरात्राच्या पार्श्वभूमीवर नूतन भक्तनिवासाचे काम पूर्ण झाल्याने तेही भाविकांसाठी खुले करून देण्यात येणार आहे.
शिर्डी, पंढरपूर, बालाजी आदी देवस्थानांप्रमाणेच कालिकादेवीचे आॅनलाइन दर्शन घेता यावे, पूजा, अभिषेक करता यावा, आरतीत सहभागी होता यावे यासाठी या वर्षापासून ही सुविधा देण्यात येणार आहे. त्यासंबंधीची कार्यवाही अंतिम टप्प्यात असून, सुविधेची अंमलबजावणी नवरात्रीच्या पहिल्या माळेपासूनच करण्याचे नियोजन असल्याचेही समजते. कामाच्या व्यस्ततेमुळे प्रत्यक्ष दर्शनासाठी वेळ देऊ न शकणाºया, शहरापासून दूर असणाºया भाविकांना शंभर ते दोनशे रूपये शुल्क मोजून आॅनलाइन दर्शनाचा लाभ घेता येऊ शकेल, असे नियोजन आहे. कालिका मंदिर आवारात मंदिर ट्रस्टतर्फे नव्याने बांधण्यात आलेल्या भक्तनिवासाच्या रंगरंगोटीचे काम सध्या सुरू असून, तेही पहिल्या माळेपासून भाविकांसाठी खुले करून देण्यात येणार आहे. भक्तनिवासात हॉल व स्वतंत्र खोल्या, प्रसाधनगृहे आदिंची सोय असून, भाविकांबरोबरच मंदिर परिसरातील दवाखान्यांमध्ये उपचारासाठी येणाºया रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांनाही नाममात्र दरात निवासाची सोय उपलब्ध होणार आहे. नवरात्र काळात मंदिराच्या भोजनगृहात नेहेमीप्रमाणे महाप्रसाद सुरु असणार असून, भाविकांबरोबरच यंदा परिसरातील दवाखान्यांमधील रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांसाठी नाममात्र दरात जेवण पुरविण्याचे नियोजनही करण्यात आले आहे. या सुविधेचाही प्रारंभ नवरात्रीच्या पहिल्या माळेपासून होण्याची योजना आहे.