आता टँकरवरून राजकारण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:14 AM2021-04-25T04:14:15+5:302021-04-25T04:14:15+5:30
नाशिक : राज्यात जाणवत असलेल्या ऑक्सिजन टंचाईच्या पार्श्वभूमीवर आता राजकारण सुरू झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे ऑक्सिजन ...
नाशिक : राज्यात जाणवत असलेल्या ऑक्सिजन टंचाईच्या पार्श्वभूमीवर आता राजकारण सुरू झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे ऑक्सिजन टँकर पाठविल्याने त्यांचे भाजपच्या वतीने आभार मानण्यात आले आहेत.
शहरात गेल्या पंधरवड्यापासून ऑक्सिजन पुरवठ्याचा घोळ सुरू आहे. मागणी इतका पुरवठा होत नसल्याने गंभीर कोरोना रुग्णांचे हाल होत आहेत. अनेक रुग्णालयांमधून रुग्णांना ऑक्सिजन नसल्याने त्यांना परत पाठवण्यात आले होते. दरम्यान, शनिवारी (दि.२४) विशाखा पट्टणम येथून ऑक्सिजन एक्स्प्रेस नाशिकमध्ये दाखल झाली. यानंतर आता त्यावरून राजकारण सुरू झाले आहे. महापौर सतीश कुलकर्णी, स्थायी समिती सभापती गणेश गिते, सभागृह नेते सतीश सोनवणे, गटनेते जगदीश पाटील यांनी पंतप्रधानांचे आभार मानले आहेत. अंबड येथील पिनॅकल मॉलजवळ टँकर आणणाऱ्या चालक आणि वाहकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सहआयुक्त माधुरी पवार, ऑक्सिजन पुरवठादार अमोल जाधव यांच्यास अन्य मान्यवर उपस्थित होते.
छायाचित्र आर फोटोवर २४ मेयर नावाने सेव्ह..