आता शेतकऱ्याला परतीच्या पाऊसाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 06:14 PM2018-09-18T18:14:49+5:302018-09-18T18:22:00+5:30

खामखेडा : चालू वर्षी गेल्या साडेतीन महिन्यात झालेल्या अल्पशा पाऊसामुळे जमिनीतील पाण्याच्या पातळीत वाढ न झाल्याने आता शेतकºयाला अपेक्षा परतीच्या पाऊसाची आहे.

Now the returning officer to the farmer returns | आता शेतकऱ्याला परतीच्या पाऊसाची

आता शेतकऱ्याला परतीच्या पाऊसाची

Next
ठळक मुद्देया वर्षीही अजून पाहिजे तसा पाऊस झालेले नाही.

खामखेडा : चालू वर्षी गेल्या साडेतीन महिन्यात झालेल्या अल्पशा पाऊसामुळे जमिनीतील पाण्याच्या पातळीत वाढ न झाल्याने आता शेतकºयाला अपेक्षा परतीच्या पाऊसाची आहे.
पाऊसाची सुरवात हि रोहिणीच्या नक्षत्रापासून होते. रोहिणी नक्षत्र साधारण २४ मे पासून होत असली तरी या नक्षत्रात पाऊस येईल याची खात्री नसते. तेव्हा शेकºयाच्या दृष्टीने मृग नक्षत्रातील पाऊस महत्वाचा असतो. या नक्षत्राच्या पाऊसावर पिकाची पेरणी केली तर पिके चांगले येते. परंतु चालू वर्षी सु वातीचे रोहिणी आणि मृग नक्षत्रेहि कोरडी गेली. मृगाच्या शेवटच्या चरण व आद्राच्या प्रारंभी पावसाला सुरुवात झाली तेव्हा शेतकºयाने या अल्पशा पाऊसावर खरिपाच्या बाजरी, मका, भुईमूग, ज्वारी, सोयाबीन, आदी पिकाची पेरणी केली. परंतु त्यानंतर पाहिजे त्या प्रमाणात पाऊस झाला नाही. अधून-मधून येत जाणाºया पाऊसामुळे पिके आता पर्यत जोमात होती. परंतु आॅगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात व सप्टेंबर महिन्याच्या सुवातील पाऊस झाल्याने पिकांना तूर्त जीवदान मिळाले होते. परंतु गेल्या पंधरा दिवसापासून पावसाने दांडी मारल्याने पिके कोमजू लागली आहेत. आता पिके फुलोरा व दाणा भरण्याच्या अवस्थेत असल्याने त्यांना पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे.
आता पावसाळा संपला असून पाऊस परतीच्या मार्गाला लागला आहे. गेल्या वर्षी पण सुरवातीला अल्प प्रमाणात पाऊस झाला होता. परंतु नंतर परतीच्या पाऊस जोरदार हजेरी लावल्याने नदी नाल्याना पाणी येऊन धरणे व नालाबांध भरल्यामुळे भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ होऊन विहिरींना मोठ्या प्रमाणात उतरले होते. त्यामुळे रब्बी हंगामातील पिके चांगल्या पैकी आले होते. या वर्षीही अजून पाहिजे तसा पाऊस झालेले नाही. विहिरी अजूनही पाहिजे त्या प्रमाणात पाणी उतरलेले नाही. आणि ज्या काही विहिरींना पाणी आहे. ते फार अल्प आहे. ते केव्हा कमी होईल याची शास्वती नाही. त्यामुळे आता शेतकºयांची पूर्ण आशा परतीच्या पावसावर आहे. परतीचा पाऊस जर चांगल्या प्रमाणात झाला, तर रब्बी हंगामातील गव्हू, हरभरा, कांदा आदी पिके घेता येतील. त्यामुळे रब्बी पिके चांगली येऊन रब्बीच्या उत्पादनात वाढ होणार आहे.

Web Title: Now the returning officer to the farmer returns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक