आता कोविशिल्डचा दुसरा डोस ८४ दिवसांनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:15 AM2021-05-15T04:15:09+5:302021-05-15T04:15:09+5:30
नाशिक : केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या नव्याने आलेल्या आदेशानुसार दिनांक १५ मेपासून कोविशिल्ड या लसीचा पहिला ...
नाशिक : केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या नव्याने आलेल्या आदेशानुसार दिनांक १५ मेपासून कोविशिल्ड या लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस घेण्याचा कालावधी हा ६ ते ८ आठवड्यांवरून १२ ते १६ आठवडे असा करण्यात आला आहे. १५ मे २०२१ या तारखेच्या आधी कोविशिल्ड लसचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना आता ८४ दिवस झाल्यानंतरच दुसरा डोस मिळेल, अशी माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. त्यामुळे शनिवारपासून (दि. १५ ) ज्या नागरिकांचा कोविशिल्ड या लसचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झालेले असतील अशाच नागरिकांना कोविशिल्ड लसचा दुसरा डोस मिळणार आहे. तसेच कोव्हॅक्सिन या लसचे पहिल्या व दुसऱ्या डोसचे अंतर पूर्वीप्रमाणे २८ ते ४२ दिवसच राहील. त्यामुळे ज्या नागरिकांचे कोविशिल्ड या लसचे ८४ दिवस पूर्ण झालेले नसतील अशा नागरिकांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. दरम्यान, शनिवारी (दि. १५) नव्या निकषानुसार रामवाडी, सिडको, पिंपळगाव खांब, स्वामी समर्थ रुग्णालय, माेरवाडी, गंगापूर, मखमलाबाद, मायको रुग्णालय, पंचवटी, सिन्नर फाटा, जिजामाता रुग्णालय, म्हसरूळ, जेडीसी बिटको रुग्णालय, तपोवन, वडनेर, गोरेवाड आणि संजीवनगर प्राथमिक आरोग्य केंद्रांत कोविशिल्डचे ४५ वर्षांवरील नागरिकांना नव्या निकषानुसार डोस देण्यात येणार आहेत.
इन्फो..
कोव्हॅक्सिन केवळ दोन केंद्रांवर
शहरातील पंचवटी येथील इंदिरा गांधी रुग्णालय आणि नाशिकरोड येथील खोले मळा प्राथमिक आराेग्य केंद्रातच ४५ वर्षांवरील नागरिकांना दुसरा डोस देण्यात येणार आहे.