आता शिवसेनाही इलेक्शन मूडमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:11 AM2020-12-23T04:11:45+5:302020-12-23T04:11:45+5:30
ग्रामपंचायत आणि नगरपालिकेच्या निवडणुका सुरू होत असून, महापालिका तसेच जिल्हा परिषदेच्या निवडणुकादेखील वर्षभराने होत आहेत. त्यादृष्टीने या बैठकीत चर्चा ...
ग्रामपंचायत आणि नगरपालिकेच्या निवडणुका सुरू होत असून, महापालिका तसेच जिल्हा परिषदेच्या निवडणुकादेखील वर्षभराने होत आहेत. त्यादृष्टीने या बैठकीत चर्चा करताना या तिन्ही निवडणुकांसाठी गाव आणि शहर पातळीवर दादा भुसे यांच्या उपस्थितीत बैठका घेण्याचे ठरवण्यात आले. संघटनात्मक बैठकादेखील सुरू करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
पक्षाचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत दादा भुसे, विधान परिषदेचे आमदार म्हणून शिफारस करण्यात आलेले विजय करंजकर आणि नूतन महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांचा सत्कार करण्यात आला.
बैठकीचे सूत्रसंचालन विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केले. जिल्हाप्रमुख विजय करंजकर, आमदार सुहास कांदे, नरेंद्र दराडे, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, माजी आमदार अनिल कदम, योगेश घोलप, काशीनाथ मेंगाळ, निर्मलाताई गावीत, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, मनपा गटनेते विलास शिंदे, उदय सांगळे, मोहन गांगुर्डे, भास्कर गावीत आदी उपस्थित होते.
इन्फो..
राज्य सरकारने केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सोशल मीडियाची स्वतंत्र टीम तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील मंत्री, खासदार आणि आमदार हे शिवसेना कार्यालयात ठरवून दिलेल्या दिवशी जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी जनता दरबार भरवणार असल्याचेदेखील यावेळी स्पष्ट करण्यात आले.
छायाचित्र आर फोटोवर २१ शिवसेना- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या बैठकीत पक्षाच्या जिल्हा संपर्क मंत्रिपदी निवड झाल्याबद्दल कृषिमंत्री दादा भुसे यांचा सत्कार करताना आमदार सुहास कांदे व विजय करंजकर. समवेत विलास शिंदे, योगेश घोलप, अजय बोरस्ते, भाऊसाहेब चौधरी, सुधाकर बडगुजर, अनिल कदम, निर्मला गावीत आदी.